जगातील महानगरे : लोकसंख्या
___________________________________
◆ शांघाई [चीन] – २.४२ कोटी
◆ कराची [पाकिस्तान] – २.३५ कोटी
◆ बीजिंग [चीन] – २.१५ कोटी
◆ दिल्ली [भारत] – १.६७ कोटी
◆ लागोस [नायजेरिया] – १.६० कोटी
◆ तीनजीन [चीन] – १.५२ कोटी
◆ इस्तंबूल [टर्की] – १.४१ कोटी
◆ टोकयो [जपान] – १.३३ कोटी
◆ गोंझू [चीन] – १.३० कोटी
◆ मुंबई [भारत] – १.२५ कोटी
Jio ला मिळाली एकूण 1.04 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक.
????रिलायन्स ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा ओघ सुरूच असून आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) जिओ प्लॅटफॉर्मने 6,441.3 कोटी रुपयांमध्ये 1.32 टक्के हिस्सेदारी ‘टीपीजी’ आणि ‘एल कॅटरटॉन’ या दोन मोठ्या कंपन्यांना विकली आहे.
????यासोबतच जिओ प्लॅटफॉर्म्सला गेल्या आठ आठवड्यांमध्ये 10 गुंतवणूकदारांकडून तब्बल 1,04,326.9 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे
????सर्वात आधी फेसबुकने 22 एप्रिल रोजी जिओमध्ये 10 टक्के हिस्सेदारी घेतली होती.
????रिलायन्स इंडस्ट्रीजने 0.93 टक्के हिस्सेदारी अमेरिकेच्या टीपीजी या कंपनीला 4,546.80 कोटी रुपयांमध्ये आणि जगातल्या मोठ्या खासगी इक्विटी कंपन्यांपैकी एक असलेल्या L Catterton कंपनीला 1,894.50 कोटी रुपयांमध्ये 0.39 टक्के हिस्सेदारी विकण्याची घोषणा केली.1989 मध्ये स्थापना झालेली एल कॅटरटॉन ही एक खासगी इक्विटी फर्म आहे.
????1992 मध्ये सुरू झालेली टीपीजी ही एक ग्लोबल अल्टरनेटिव अॅसेट फर्म आहे. या गुंतवणुकीसोबतच कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म्समधील एकूण 22.3 हिस्सेदारी विकली आहे.
????सर्वप्रथम फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये फेसबुकनं 43 हजार 574 कोटी रूपयांची गुंतवणूक करत 9.99 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती.
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?
A. 200.60 लाख हेक्टर
B. 207.60 लाख हेक्टर
C. 307.70 लाख हेक्टर✔️✔️
D. 318.60 लाख हेक्टर
????कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले.
A. 513 ✔️✔️
B. 213
C. 102
D. 302
???? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?
A. तेरणा
B. प्रवरा
C. मांजरा
D. भातसा ✔️✔️
????___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.
A. कांडला ✔️✔️
B. कोची
C. मांडवी
D. वरीलपैकी नाही
????जागतिक वारसा शिल्पस्थानात _ या लेणीची नोंद केलेली आहे.
A. अजंठा लेणी ✔️✔️
B. कार्ले लेणी
C. पितळखोरा लेणी
D. बेडसा लेणी
????खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?
A. आंध्र प्रदेश ✔️✔️
B. महाराष्ट्
C. मध्य प्रदेश
D. गुजरात
????गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
A. अकोला
B. बुलढाणा
C. धुळे ✔️✔️
D. ठाणे
????2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ____ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.
A. नाशिक
B. औरंगाबाद
C. पुणे ✔️✔️
D. सोलापूर
????महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?
A. सह्याद्रि पर्वत ✔️✔️
B. सातपुडा पर्वत
C. निलगिरी पर्वत
D. अरवली पर्वत
????महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _ नावाने ओळखली जाते.
A. सायरस
B. ध्रुव
C. पूर्णिमा
D. अप्सरा✔️✔️
12 मोठ्या सामंजस्य करारांवर मुख्यमंत्र्यांचं स्वाक्षऱ्या.
????महाराष्ट्रातील अर्थचक्र गती देण्यासाठी 12 मोठ्या सामंजस्य करारांवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षºया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या करारांमुळे आपला मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 ची सुरुवात होईल.
????त्यात प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर, 40,000 एकराहून अधिक क्षेत्रफळाची लँडबँक, लवचिक भाड्याने आणि किंमतीची रचना, महापरवाना च्या माध्यमातून 48 तासात स्वयंचलित परवानग्या, विशेष कामगार संरक्षण मार्गदर्शन व स्थानिक कौशल्य यासाठी कामगार ब्युरो यासारखे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत.
????या सामंजस्य कराराद्वारे अमेरिका , चीन , दक्षिण कोरिया, सिंगापूर व भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास सहमती दिली असून ते अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया व इतर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन रोजगारदेखील उपलब्ध होईल, असा दावाही सूत्रांनी केला.
कालापानी, लिपुलेखमधील जमीन भारतीय ग्रामस्थांच्या नावावर.
????उत्तराखंडमधील कालापानी व लिपुलेख हे भाग नेपाळने त्यांच्या नकाशात दाखवले असले तरी जमिनीच्या नोंदीनुसार तो भारताचा भाग आहे असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
????स्थानिक नोंदीनुसार कालापानी व लिपुलेख हे दोन्ही भाग जेथे आहेत ती जमीन भारतातील दोन खेडय़ात राहणाऱ्या लोकांच्या मालकीची आहे.
????लिपुलेख, कालापानी, नाभीधांग या भारत-नेपाळ सीमेवरील भागातील जमीन गरबियांग व गुंजी या धारचुला विभागातील खेडय़ात राहणाऱ्या लोकांच्या मालकीची आहे.
????हा भाग पिठोरगड जिल्ह्य़ात येतो, असे धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी ए. के. शुक्ला यांनी सांगितले.
????कैलाश मानसरोवर यात्रा दरवर्षी भारत-चीन सीमेवर लिपुलेख मार्गे जात असते. गारबीयांगच्या ग्रामस्थांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांनी कालापानी येथे 1962 च्या चीन युद्धापूर्वी शेती सुरू केली होती.
????कृष्णा गाब्रियाल यांनी सांगितले की, 1962 पूर्वी तेथे कडधान्ये पिकवली जात होती.काली नदी ही नेपाळ व भारत यांच्या सीमेवर आहे.