लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या पानटपरी चालकांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर(प्रतिनिधी)लॉकडाऊन सुरू असल्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून पानशॉपही बंद आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर दुकानाप्रमाणे पान दुकानांनाही नियम व अटी व लावून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अथवा १५ हजार रुपये दरमहा आर्थिक मदत करावी, अशी मागणी पानटपरी धारकांकडून करण्यात आली आहे. त्यांनी यासंदर्भात प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन दिले.
प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना नागराज पाटील,सुनील शर्मा,हितेश चौधरी,मुकेश अग्रवाल,दीपक चौधरी,गोकुळ पाटील,भैय्या पाटील,उमेश चौधरी,प्रमोद पाटील,भटू शिंदे आदीच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहरात अनेक वर्षांपासून आम्ही सर्व परवानाधारक पानटपरी व्यासायिकईक हा व्यवसाय करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत आहोत. गेल्या तीन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय बंद झाल्याने उपासमारीची वेळ आमच्यावर आली आहे.
आता सात जून पासून अनेक दुकानांचे निर्बंध उठवून त्यांना सकाळी ९ ते ३ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे,यात आमच्या व्यवसायास परवानगी नसल्याने वारंवार आम्हाला प्रशासनाच्या रोशास सामोरे जावे लागत आहे,यासाठी आम्हाला देखील सकाळी ९ ते ३ या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी,आम्ही सर्व सोशल डिस्टनसिंग सह सर्व नियम पाळण्याची काळजी घेऊ,आणि परवानगी देता येत नसेल तर दरमहा १५ हजार रु शसनाकडून उदरनिर्वाहसाठी द्यावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.