पक्षी मित्रांनी मोराला वाचवण्याचा केला प्रयत्न, मोर वनविभागांच्या कर्मचाऱ्यांकडे केला स्वाधीन
अमळनेर (प्रतिनिधी)जंगलातून विहार करत आलेल्या राष्ट्रीय पक्षी मोरावर कुत्र्यांनी हल्ला केल्याने जबर जखमी होऊन मोराचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील विद्या विहार कॉलनीत घडली. पक्षी मित्रांनी मोराला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला.
अमळनेर शहरातील विद्या विहार कॉलनीत जंगलातून उडत आलेल्या राष्ट्रीय पक्षी मोरावर कुत्र्यांनी हल्ला केल्यावर रवि पाटील, जीवन जाधव यांनी तात्काळ धाव घेत मोराला वाचवण्याचा प्रयत्नं केला. परंतु हल्ल्यात मोर गंभीर जखमी झाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले नाही. मोर राष्ट्रीय पक्षी असल्याने त्यांचे शासकीय इतमामात अंत्य संस्कार व्हावेत म्हणून रवि पाटील यांनी पक्षी मित्र जितू वाणी, अश्विन पाटील तसेच पत्रकार संजय पाटील यांना मोबाईलवर संपर्क करत माहिती दिली. त्यांनी तात्काळ वन विभागाचे अधिकारी वंदना कोळी यांना फोन करून माहिती दिली. त्यांनी अनिकेत पाटील, मयूर पाटील या वन विभागांच्या कर्मचाऱ्यांना पाठवले. मोराला वनविभागांच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करतांना रवि पाटील सोबत कपिल पाटील (म.पोलीस), पक्षी मित्र अश्विन पाटील, जितू वाणी, जीवन जाधव, दिनेश पाटील, स्वप्निल वाणी उपस्थित होते.