स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

खासगी प्रयोगशाळांत 2,200 रुपयांत चाचण्या…

???? राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीतजास्त 2,200 रुपये इतका दर आकारला जाणार असून, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2,800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे.

???? तर 2 जून रोजी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने समिती गठित करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता.

???? तसेच राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4,500 रुपये आकारत होत्या. घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे 5,200 रुपये आकारले जात होते. मात्र, समितीने केलेला अभ्यास आणि काढलेल्या निष्कर्षावरून आता राज्यात कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त 2,200 रुपये आकारले जातील, तर घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी 2,800 रुपये आकारले जातील.

⭕️महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा⭕️

१. खालीलपैकी कोणत्या समितीचा कार्यविषयक ‘पंचायतराज संस्था’ हा होता ?
अ) जी. व्ही. के. राव समिती
ब) लळा सुंदरम समिती
क) अशोक मेहता समिती ✅✅
ड) व्ही.कृष्णमेनंन समिती

२) चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असतांना सूर्यग्रहण झाले तर अशे ग्रहण ……….असेल?
१) खग्रास
२) खंडग्रास
३) कंकनाकृती ✅✅
४) यापैकी नाही

३) केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली ‘माडिया गोंड’ही जगात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
१) सिंधुदुर्ग
२) चंद्रपूर ✅✅
३) गोंदिया
४) रायगड

४) खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा आपणास मिळणाऱ्या परकीय मदतीत आजही सर्वाधिक हिस्सा आहे ?
१) रशिया
२) जपान
३) ब्रिटन
४)अमेरिका ✅✅

५) ‘मुंबई बेट’ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ……….
१) याने पोर्तुगीजांकडू जिंकून घेतले.
२) याने मोघलांकडून जिंकून घेतले.
३) यांच्यामते इंग्लंडहून सुंदर शहर होते
४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले. ✅✅

६) ‘ग्रँड ट्रॅक’ हा राष्ट्रीय महामार्ग या दोन शहरांना जोडतो.
१) कोलकत्ता : अमृतसर ✅✅
२) मुंबई : दिल्ली
३) मुंबई : कोलकत्ता
४) कोलकत्ता : चेन्नई

७) अग्निकंकण उर्फ ‘रिंग ऑफ फायर’खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधीत आहे
अ) भूकंपप्रवण क्षेत्र
ब) ज्वालामुखी उद्रेकाचे क्षेत्र
क) प्रशांत महासागराभोवतीचा भाग

१) फक्त अ,ब व क ✅✅
२) फक्त ब व क
३) फक्त ब व अ
४) अ ते क

८) ‘रिंट ऑफ व्हेबिअस कॉपर्स’ व ‘रिंट ऑफ मॅडामस’ हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधीत आहेत
१) संपत्तीचा हक्क
२) धर्मस्वातंत्र्याचा हक्क
३) स्वातंत्र्याचा हक्क
४) घटनात्मक दाद मागण्याचा हक्क ✅✅

९) खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रीपतीच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधीत आहेत?
१) ३५२,३५६,३६० ✅✅
२) १६३,१६४,१६५
३) ३६७,३६८,३६९
४) ३६९,३७०,३७१

10) भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर,१९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते.या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते?

१) डॉ. राजेंद्रप्रसाद
२) हृदयनाथ कुंझरू
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) डॉ. सच्चिदानंद सिन्हा✅✅

११) विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जाते?
१) एक-पप्ष्टांश
२) एक-बारांश ✅✅
३) एक-पंचमाश
४) एक-तृतीयांश

१२) दादाभाई नौरोजीनी आपला सुप्रसिद्ध ‘वहन सिद्धांत’ (Drain Theory) आपल्या ……….ग्रंथात मांडला आहे .
१)पाँव्हार्टी इन इंडिया
२) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल इन इंडिया ✅✅
३) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल
४) ब्रेन ड्रेन ड्युरिंग ब्रिटिश पिरिअड

१३) गंगा नदी येथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगेच्या मुखाशी गाळ साचून ……..या नावाने बेट तयार झाले आहे
१) सुंदरबन
२) प्रयाग
3) न्यू-मूर ✅✅
४) कोलकात्ता

१४) संगणकामधील फ्लॉपी डिस्क म्हणजे……..होय.
१) माहिती एकत्र करणारी यंत्रणा
२) केंद्रीय मेमरी
३) एक सॉफ्टवेअर
४) माहिती साठवण्याचे एक साधन ✅✅

१५) ‘P’हा ‘K’चा भाऊ आहे .’S’हा ‘P’ चा मुलगा आहे .’T’ही ‘K’ची मुलगी आहे .’E’आणि ‘K’परस्पर बहिणी आहेत; तर ‘E’che ‘T’शी नाते काय?
१) आत्या
२) मावशी ✅✅
३) मामी
४) बहीण

Jp question

“Economics of public and private helth care And health insurance in india” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.?

उत्तर: ब्रिजेश पुरोहित

????रिझर्व्ह बँकेनी बँकेचे CEO आणि पूर्ण-वेळ संचालकांसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष करण्याचा प्रस्ताव मांडला????
_______________________________________
◾️बँकिंग क्षेत्रातला कारभार सुव्यवस्थित करण्याच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष करण्याचा आणि प्रवर्तक गटाशी संबंधित असलेल्यांसाठी जास्तीत जास्त 10 वर्षाचा कार्यकाळ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

◾️चांगल्या प्रशासन प्रवृत्तीची प्रबळ संस्कृती क्षेत्रात रुजविण्यासाठी आणि मालकांना व्यवस्थापनातून वेगळे करण्याचे सिद्धांत अवलंबण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक या पदांसाठीचा कार्यकाळ मर्यादित ठेवणे इष्ट आहे, असे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.
_______________________________________

भारतात नोटा कश्या तयार होतात ? खराब नोटांचं काय करतात ? जाणून घ्या!

???? रुपया शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम शेर शाह सुरीने भारतावर राज्य करीत असताना १५४०-१५४५ च्या कालखंडातकेला होता. सध्या भारतासमवेत इतर ८ देशांमधील चलनाला रुपया म्हटले जाते. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम भारतीय रिजर्व बँकच्या अखत्यारीत येते. भारतात सर्वात पहिली वॉटरमार्क असलेली नोट १८६१ मध्ये छापण्यात आली होती. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय नोटांमध्ये इतर १५ भाषांचा वापर केला जातो.

???? भारतात नोटा कुठे छापल्या जातात ?
=====
=====
देशात चार नोट प्रेस आणि एक पेपरमिल आहे.
देवास (मध्य प्रदेश),
नाशिक (महाराष्ट्र), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि
म्हैसूर (कर्नाटक)
या चार ठिकाणी नोटा छापल्या जातात.

???? देवास येथील नोट प्रेस मध्ये एका वर्षात २६५ कोटी नोटा छापले जातात. इथे २०, ५०, १००, ५०० किंमतीच्या च्या नोटा छापल्या जातात नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाईसुद्धा इथेच बनते.

???? नाशिक नोट प्रेस मध्ये १९९१ सालापासून इथे १, २, ५, १०, ५०,१०० किंमतीच्या नोटा छापल्या जातात. सुरवातीला इथे ५० आणि १०० च्या नोटा छापल्या जात नव्हत्या.

???? भारतात नाणी कुठे बनवली जातात ?
१. मुंबई
२. कोलकत्ता
३. हैदराबाद
४.नोएडा

???? नाण्यांच्या चिन्हावरून समजते की ते कुठे बनवले आहेत ?

प्रत्येक नाण्यावर असलेल्या चिन्हावरून समजते की ते नाणं कुठे बनवलं गेलं आहे. नाण्यावर छापलेल्या वर्षाच्या खाली जर स्टारचे चिन्ह असल्यास ते हैदराबादला बनवलं गेलं आहे. जर वर्षाच्या खाली टिंब असेल तर ते नाणं नोएडाला बनवण्यात आलं आहे. वर्षाच्या खाली डायमंड असल्यास ते नाणं मुंबईत बनवलं आहे. कोलकत्ता मध्ये बनवलेल्या नाण्यावर कोणतेच चिन्ह नसते.

???? नोटा कोणत्या वस्तूने बनले जातात ?

रिजर्व बँक ऑफ इंडिया नोट बनवण्यासाठी कापसाच्या कागदाचा आणि विशिष्ट प्रकारच्या शाईचा वापर करते. या प्रकारच्या कागदाचे उत्पादन काही प्रमाणात महाराष्ट्रात (सीएनपी) होते, तर मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश मधील होशंगाबाद मध्ये होते. काही पेपर आयत सुद्धा केले जातात.

???? भारतात प्रत्येकवर्षी किती नोटा छापल्या जातात ?

रिजर्व बँकेच्या एका अहवालानुसार भारत प्रत्येकवर्षी २००० कोटी नोटा छापतो .यामधील ४० टक्के खर्च कागद आणि शाई आयात करण्यामध्ये जातो. हा कागद जपान, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या देशांमधून आयात केला जातो. नोटा किती छापल्या पाहिजेत, याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय रिजर्व बँकेला आहे. नाणी किती तयार केली जावीत याचा निर्णय पूर्णतः सरकार घेते.

???? नोटा कशा छापल्या जातात ?

विदेशातून आयात होणाऱ्या आणि होशंगाबाद मधून येणाऱ्या पेपरशीटला एका खास मशिन सायमंटन मध्ये टाकले जाते आणि नंतर इंटाब्यू नावाच्या मशीनने त्यावर कलर केले जाते. याप्रकारे नोट तयार होतात. त्यानंतर चांगल्या आणि खराब नोटा वेगळ्या केल्या जातात. एका वेळेस एका शीट मध्ये ३२ ते ४८ नोटा छापण्यात येतात.

???? खराब झालेल्या नोटांना कुठे जमा केले जाते ?

नोटा तयार करतानाच त्यांची ‘सेल्फ लाइफ’ (नोटा योग्य प्रकारे बनण्याचा अवधी) ठरवण्यात येते. हा अवधी संपल्यानंतर किंवा सारख्या वापरणे खराब झालेल्या नोटांना रिजर्व बँक परत घेते.

???? फाटलेल्या जुना नोटांचे काय केले जाते ?

खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटा रिजर्व बँक परत चलनात आणत नाही, कारण तसे करणे योग्य नसते. रिजर्व बँक सर्व व्यावसायिक बँकांकडून फाटलेल्या आणि खराब नोटा मागवून एकत्र जमा करते. सुरवातीला या नोटा जाळल्या जात असतं, परंतु आता RBI ने पर्यावरणासंवर्धनाच्या दृष्टीने ह्या नोटा जाळणे बंद केले आहे. RBI ने एक ९ कोटींची मशीन आयत केली आहे, ही मशीन जुन्या नोटांचे छोटे तुकडे करते. त्यातून मजबूत अशी विट बनवली जाते .ह्या विटा खूप कामांमध्ये उपयोगी येतात.

???? भारतात प्रत्येक वर्षी ५ दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात, ज्यांचे एकूण वजन ४५००० टन एवढे असते.

????डॉ. आर. व्ही. भोसले; भारतात पहिला रेडिओस्कोप तयार करणारा खगोलशास्त्रज्ञ हरपला

भारतात पहिला रेडिओस्कोप तयार करणारे व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करणारे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ ‘कोल्हापूर भूषण’ आर. व्ही. भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले._
कोल्हापूर: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाच्या खगोलशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. राजाराम विष्णू तथा आर. व्ही. भोसले यांचे (वय ९२) रविवारी सकाळी टाकाळा येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. भोसले हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील बस्तवडे (ता. कागल) गावचे. पुणे विद्यापीठातून ते बी. एस्सी. ऑनर्स (मॅथेमेटिक्स फिजिक्स) झाले. गुजरात विद्यापीठातून त्यांनी १९६० मध्ये पी.एचडी. घेतली. ‘आयनोस्फेरिक फिजिक्स’ विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. इंडियन अकडेमिक ऑफ सायन्सेसची (बंगळुरू) फेलोशिपही त्यांना मिळाली होती. ते ‘ इंडियन फिजिक्स असोसिएशन ‘चे (मुंबई) अजीव सदस्य होते.

भारतात पहिला रेडिओस्कोप तयार करण्याचे श्रेय डॉ. भोसले यांना जाते. इस्रोचे संचालक विक्रम साराभाई, होमी भाभा, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत डॉ. भोसले यांनी काम केले. पन्हाळा गडावर अवकाश संशोधन प्रयोगशाळा सुरू व्हावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *