अमळनेर (प्रतिनिधी) शहरात सोमवारी पुन्हा तीन रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आजपर्यंत अमळनेर तालुक्यातील कोरोन बाधीताची संख्या २३० इतकी झाली आहे. यापैकी मयत २४ आहेत, तर १३० कोरोना मुक्त झाले आहेत.
अमळनेर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाकडून उपाय योजना केल्या जात असल्या तरी त्याच्यावर नियंत्रण आणता आलेले नाही. तसेच अमळनेर शहरात सोमवारी सकाळी १ आणि सायंकाळी २ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात सकाळी जिनगर गल्लीत तील एक, तर सायंकाळी चौधरी वाड्यातील एक तर मराठे गल्लीतील एक असे दिवसभरात ३ रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे अमळनेर कोरोन बाधीताची संख्या २३० इतकी झाली आहे यापैकी मयत २४ झाली आहेत, तर कोरोना मुक्त १३० कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.