अमळनेर शहरातील गांधलीपुरा पोलीस चौकीच्या पुढील दुकाने, इमारतींचे अतिक्रमण केले उद्ध्वस्त

वाहतुकीची कोंडी फोडल्याने नगरपालिकेच्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी केले स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी)गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गांधलीपुर पोलीस चौकीच्या पुढे दुकाने,इमारती बांधून मुख्य रस्ता गिळंकृत करून केलेले अतिक्रमण नगरपालिकेने सोमवारी उद्ध्वस्त केल्याने वाहतुकीची कोंडी फोडली. यामुळे पालिकेच्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.
अमळनेर शहरातील दगडी दरवाज्या समोरील अतिक्रमनानंतर गेल्या अनेक वर्षापासून गांधलीपुर पोलीस चौकीच्या पुढे असलेल्या मुख्य रस्त्यावर दुकाने,इमारती बांधून रहदारीच्या रस्त्यावर अडथळा निर्माण केला होता. पालिकेने आखून दिलेल्या गटारीचीही पर्वा न करता थेट रस्त्यावर घरे बांधून दुकाने थाटली होती. त्यांच्यावर सोमवारी पालिकेने सकाळीच कार्यवाही केली. याठिकाणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी भेट देऊन पहाणी केली.
प्रसंगी पालिकेच्या नियमांचे कुठेही पालन होत नसून दगडी दरवाजा ढासळल्याने संपूर्ण वहातून पर्यायी मार्गाने वळविली असतानाही या ठिकाणावरील नागरिक अतिक्रमणे काढण्यास तयार नव्हते.तर ये जा करणाऱ्यांना वहातुकीची कोंडी होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या.शेवटी रोड मोठा करावा लागणार होता. त्याकरिता माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पुढाकार घेत सोमवारी या अतिक्रमण धारकांशी बोलून त्यांच्याच उपस्थितीत अतिक्रमणे काढून रस्त्यावर दुभाजकांची आखणीही करण्यात आली.यासाठी पालिकेने २ जेसीबीद्वारे हे अतिक्रमणे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल,सोमचंद संदानशिव यांच्या अतिक्रमण हटाव टीमच्या सहाय्याने काढण्यात आले. तदनंतर पालिकेचे बांधकाम अभियंता संजय पाटील, कारकून मिलिंद चौधरी,हरीश पाटील यांनी रस्त्याची मोजमाफ करुन दुभाजकांची आखणीही केली.शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी पो. नि. मोरे यांच्यासह मोठा पोलीस ताफाही या ठिकाणी उपस्थित होता.

अतिक्रमणे निघून गेल्याने रस्त्या झाला मोठा 

गेल्या अनेक वर्षांपासून ही अतिक्रमणे वाढतच होती. प्रत्येकाने जणू रस्त्यावर येण्याची शर्यतच एकमेकांशी लावली असल्याची प्रचिती येत होती.या सर्व अतिक्रमण धारकांना असे करत ३० वर्ष झाली असावी. पण ते अतिक्रमण काढण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. शेवटी अतिक्रमण काढणे, पर्यायी वहातुकीला न्याय देणे ही काळाची गरज असल्याने परिवर्तन हा संसाराचा नियम सर्वानी लक्षात घेता ही अतिक्रमणे निघून रस्त्या मोठा झाला आणि अस्ताव्यस्त झालेल्या वाहतुकीने मोकळा श्वास घेतला.

माजी आमदार साहेबराव दादांनी एक नंबर काम केल्याचे नागरिकांनी थांबून केले विशेष कौतुक

रस्त्यावरून जात असताना अनेक नागरिकांनी हे दृश्य बघितले. गेल्या अनेक वर्षापासून असेच चालत आलेल्या कामात अखेर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी हात घातल्याने  परिवर्तन झाले. त्यामुळे हे बघता नागरिकांनी थांबून “दादा एक नंबर काम केले” म्हणत कौतुक करीत होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *