अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील तांबेपुरा भागातील सानेनगरातील सार्वजनिक शौचालयांचा मैला बाहेर वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याकडे नगरपालिका सोयिस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याने ”खबरीलाल”ने याविषयी वृत्त दिल्याने नगरपालिकेला खळबळून जाग आली. त्यांनी लगेच काम सुरू करून शौचालयाची साफसफाई करून टाकीचे अर्धवट राहिलेले कामही पूर्ण केले आहे. यामुळे या परसरातील नागरिकांनी ”खबरीलाल”चे खास कौतुक करीत न्याय मिळवून दिल्याने आभार ही व्यक्त केले.
अमळनेर शहर कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. यात तांबेपुरा भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे येथील सार्वजनिक शौचलयांचा अत्यंत दैनिय अवस्था झाली होती. दोन ते ती महिन्यापासून शौचालय सफाई कामगार या भागात फिरकलेच नाहीत. त्यामुळे शौचालय तुटुंब भरले होते. चार महिन्यापासून टाकीचा स्लॅबही नगरपालिकेने फोडून अर्धवट काम सोडून दिले आहे. त्यामुळे यातून थेट मैला हा रस्त्यावर येत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यात पुन्हा पावसाळा सुरू झाल्यामुळे नागरिकांनी जीने मुश्किल होणार होते. याबाबत खबरीलालने सविस्तर वृत्त दिल्याने नगरपालिकेला खळबळून जाग आली. त्यांनी लगेच जेसीबीच्या सहाय्याने या शौचलयांचे काम पूर्ण केले. त्यामुळे नागरिकांची जीवघेण्या दुर्गंधीपासून सुटका झाली आहे.”खबरीलाल”ने वृत्त दिल्यामुळेच आपली समस्या सुटल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. तर यापुढेही सर्वसामान्यांच्या पाठीशी ”खबरीलाल” खंबीरपणाने उभा राहिल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.