अमळनेर (प्रतिनिधी) शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रवादी काँगेसच्या वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १४ मध्ये आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील व भटू पाटील यांनी नागरिकांना गोळ्यांचे वाटप केले. या वेळेस नागरिकांना घरातच राहावे विनाकारण बाहेर जाणे टाळावे. तसेच अजून औषधी लागल्यास संपर्क करावा, असे आवाहन केले. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सनी गायकवाड, संजय पाटकरी, विनोद पाटील, कविष पाटील, मोहित पवार, गौरव पवार, सिद्धू पाटील उपस्थित होते.