अमळनेर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्येशून लिहिलेल्या पत्राचे वाटप माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
शहारातील पैलाड, श्रीराम कॉलनी, सानेनगर भागात या पत्रांचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी नागरिकांशी सुसंवाद साधत केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या जीएसटी, कश्मीर प्रश्न याबाबत माहिती दिली. या वेळी भाजपा शहराध्यक्ष उमेश वाल्हे, उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे, युवा मोर्चा अध्यक्ष योगीराज चव्हाण, पंकज भोई, राहुल चौधरी, समाधान पाटील, बाळा पाटील कार्यकर्ते उपस्थित होते.