राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघतर्फे जानवे आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध

मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दोषींवर अजामिनपात्र गुन्हा दाखलची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघतर्फे निषेध करण्यात आला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे.
जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रांत नियमित कामकाज करत असलेले कोरोना योद्धा डॉ. संजय रनाळकर यांना पुणे येथील डॉ. डी .वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज लोहेगाव येथील प्रा. गौरव चंद्रकांत विसपुते व डॉ. संजय रनाळकर यांच्या पत्नीने त्यांच्या दालनात जावून शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कागदपत्रेही फाडली आहेत. या मारहाणमध्ये डॉ. रनाळकर यांच्या डाव्या हतावर दुखापत झाली आहे. या मारहाणमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी व येथे कार्यरत सर्व आरोग्य कर्मचारी यांचे मनोबल खचलेले आहे. या मारहाणमुळे कोरोना साथ प्रतिबंधच्या उपाय योजना करताना सामाजिक सहकार्य महत्वाचे असते अश्या वेळेस अचानक झालेल्या मारहाण प्रकरणामुळे साथ प्रतिबंध व आरोग्य विषयक कामकाजात परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोषींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी व या संदर्भात संबंधित शासकीय विभागास योग्य ते निर्देश देण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र राज्य व वैद्यकीय अधिकारी महासंघ अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *