खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी इमारतींमध्ये भडकले अग्नितांडव

लाखो रुपयांचे संसार उपयोग साहित्य जळून झाले खाक

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन इमारतींना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी दिनांक १४ रोजी घडली. यात लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्या जळून खाक झाले आहे. तर दुसऱ्या आगीत चार आणि इमरातीचेही नुकसान झाले आहे. तसेच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांमुळे वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे आजूबाजूच्या इमारतींना आग लागण्याचा धोकाही टळला.
अमळनेर शहरातील सुरभी कॉलनीतील दशरथ पवार हे प्रशांत जाधव यांच्या घरात भाड्याने राहतात. त्यांना सर्पदंश झाल्याने ते धुळ्याला दवाखाण्यात दाखल होते. रविवारी दिनांक १४ रोजी सकाळी अचानक त्यांच्या घराणे पेट घेतला. रवी पाटील यांनी ताबडतोब आगीचा बम्ब मागवला आणि आगीची माहिती दशरथ पवार यांना दिली.  त्यांच्या पत्नी वर्षा पवार या अमळनेरला घरी आल्या. त्यांच्या घरातील सर्व दैनंदिन जीवनातील साहित्य ,काही रोख रक्कम जळून खाक झाले होते. अग्निशामक दलाने वेळीच आग आटोक्यात आणली होती. वर्ष पवार यांनी पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे

स्टेशनरोडीवरील जुन्या दवाखान्याच्या इमारतीला आग लागून झाले नुकसान

तर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवरील डॉ. रा. का. पाटील यांच्या जुन्या दवाखान्याच्या इमारतीत भरलेल्या चाऱ्याला अचानक आग लागली. चाऱ्याने पेट घेताच वरच्या फायबर पत्र्यांनी पेट घेतला आणि हळूहळू इमारतीच्या लाकडांनी दरवाज्यांनी पेट घेतला. नगरपालिकेच्या दोन्ही अग्निशामक बंबाना बोलावण्यात आले. नितीन खैरनार, फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, जफर खान, आंनदा झिम्बाल, आकाश बाविस्कर, योगेश धनगर आदींनी आग विझवली. शहरात दोन्ही ठिकाणी अग्निशामक कर्मचाऱ्यांनी वेळीच आग विझवल्याने आग आजूबाजूला पसरली नाही त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button