टाऊन हॉलजवळ एक नवीन ३४ वर्षीय पुरुष, तर शहापूर येथे ८२ व ३८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात रविवारी पुन्हा ५ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर २६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही २२६ पर्यंत पोहोचली आहे.
अमळनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संपर्काबरोबरच नवीन रुग्णही आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रशासनावरचा ताण वाढ आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून सुरक्षित राहावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या ठिकाणी आढळून आले पॉझिटिव्ह रुग्ण
टाऊन हॉलजवळ एक नवीन ३४ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर संपर्कातील शहापूर येथील ८२ वर्षीय महिला आणि ३८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. तर गांधलीपुरा भागातील ३७ वर्षोय पुरुष , २८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच २६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत आणि नव्याने १२ अहवाल पाठवण्यात आले आहेत.