राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त युवसेनेने राबवला उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथे युवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून संपूर्ण गाव सॅनिटायझेशन केले. तसेच ग्रामस्थाना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्याही वाटप करण्यात आल्या. याबरोबरच नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
मंगळरूळ येथील ग्रामविकास शिक्षण मंडळाचे चेअरमन व युवा सेनेचे कार्यकर्ते श्रीकांत अनिल पाटील यांनी स्वखर्चाने गावात कोरोना संसर्ग झालेला नसला तरी कार्यकर्ते समाधान पारधी, विकी पाटील, पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, चंद्रशेखर पाटील यांच्या सहकार्याने गावातील कानाकोपऱ्यात यंत्राने सॅनिटायझर फवारणी केली. तसेच गावात सर्व ग्रामस्थांना प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप केले. या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधानही व्यक्त केले.