अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्राध्यापिकेला थांबवून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील प्राध्यापिका जयश्री साळुंखे या १३ रोजी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास विजय बेकरी समोरून जात होत्या. या वेळी बेकरीच्या मालकांनी त्यांना रस्त्यावर थांबवून तुम्ही लुटमारीचे धंदे करतात, या कारणावरून विजय फरसाण आणि बेकरीच्या मालकाने व दोन कर्मचाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी प्राध्यापिकेच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास प्रभारी डीवायएसपी सौरभ अग्रवाल करीत आहेत.