माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने राबवला उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आदर्शगाव राजवड येथे ४०० कुटुंबावा आर्सेनिक अल्बम ३० गोळयांचे वाटप करण्यत आले. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
आरोग्यसेवका सुष्मा पाटील, उज्ज्वला पाटील, अंगणवाडीसेविका उषा पाटील, मदतनीस प्रवीण बैसाणे यांनी गावातील ४०० कुटुंबाच्या घरोघरी जाऊन आर्सेनिक अल्बम ३० या गोळयांचे वाटप केले. याप्रसंगी गावातील नागरीक सुभाष काका, लोटन देसले, अमोल पाटील, राजू देशमुख, राकेश पाटील, भास्कर नाईक, भागाबाई नाईक, भिकुबाई भिल आदी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.