अमळनेर (खबरीलाल) कोरोनामुळे सर्वत्र निर्माण झालेले नैराश्य आणि उदासिनतेच्या वातावरणात एक हस्याची लहर उमटून एक ”कॉमन मॅन”ला जगण्याला नवी उर्जा देण्यासाठी ”खबरीलाल” खास आपल्या वाचकांसाठी विशेष व्यंगचित्राचे सदर लवकरच सुरू करीत आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण बाळासाहेब ठाकरे, विकास सबनीस, बी.वी. राममूर्ती, मारिओ मिरांडा, सुधीर तैलंग यांच्या व्यंगचित्रांनी लोकांना खळखळून हसवले आहे. वेळप्रसंगी त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून राजकीय, सामाजिक परिस्थितावर अचूक असे भाष्य करीत चिमटाही काढला आहे. म्हणूनच ”खबरीलाल”नेही साक्षात ”गजाननांच्या” कुंचल्यातून साकरलेली व्यंगचित्रे आपल्या वाचकांसाठी सुरू करीत आहे. यात यातून कोणाचे व्यंग दाखण्याचा किंवा मन दुखवण्याचा मूळीच उद्देश नसून निव्वळ असलेली परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारे व्यंग कॉमन मॅनला जगण्याची उर्मी देण्यासाठी हे सदर सुरू करीत आहोत. त्यामुळे ते वाचकांना निश्चितच भावेल, असा खबरीलाल चा विश्वास आहे.