घरातील ५० हजार रोख रक्कम , घरातील धान्य आणि कपाट, गाद्या, फर्निचर जळून झाले खाक
अमळनेर (प्रतिनिधी) घराला शॉर्ट सर्किटने आग लागून घरातील ५० हजार रोख आणि संसार उपयोगी साहित्य जळून संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना तालुक्यातील सारबेटे येथे १३ रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली. एन पेरणीत डोळ्यादेखत संसार उद्ध्वस्त झाल्याने दाम्पत्याला रडू कोसळले. यात त्यांचे सुमारे साडे तीन लाखाचे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथील रतीलाल उखा पाटील यांच्या घराला १३ रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले. यात घरातील ५० हजार रोख रक्कम , घरातील धान्य व कपाट , गाद्या , फर्निचर असे जीवनोपयोगी सर्व वस्तू जळून राख झाल्याने घरमालकाचे सुमारे साडे तीन लाखाचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी बादल्या आणि मिळेल त्या साहित्याने पाणी टाकून आग विझवली.