अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील नांद्री येथे सामाजिक अंतर राखत मोजके आप्तेष्ट व तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांचा उपस्थितीत माळी समाजाचा घरगुती वातावरणात आदर्श विवाह सोहळा झाला.
अमळनेर तालुक्यातील नांद्री येथील रहिवाशी हिरालाल शिवलाल महाजन यांचे द्वितीय सचिन तसेच हिंगोणे (ता.धरणगाव) येथील विजय पंडीत पाटील यांची कन्या हर्षा यांचा विवाह दि.18मे रोजी ठरला होता. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान दोन्हीकडील नातेवाईकांनी मध्यस्थी करत साध्या पद्धतीने दि.११ जून रोजी घरगुती वातावरणात सामाजिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळून हा आदर्श विवाह सोहळा झाला.
यावेळी लग्न समारंभात दोन्ही वधू-वर पक्षतील नातेवाईक मुलीचे आई, वडील, भाऊ, काका, काकू, मुलाचे आई, वडील, काका, काकू, पत्रकार वसंतराव पाटील,पत्रकार-प्रा.हिरालाल पाटील, पत्रकार-गजानन पाटील तसेच मित्रपरिवार आदी उपस्थित होते.