अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, कापूस लागवड आणि पेरणीला येणार वेग
अमळनेर (प्रतिनिधी)शहरासह तालुक्यात मान्सूनचे शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार आगमन झाले. यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर काहींच्या घरांचे छप्पर उडाले. तर शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला. यामुळे कापूस लागवड आणि पेरणीला वेग येणार आहे.
अमळनेर शहरात शुक्रवारी सायंकाळी वादळ वार्यासह पाऊस झाल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विद्युत तारांवर तर काही ठिकाणी घरांवर, रस्त्यावर पडली आहेत. त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. अमळनेर शहरात बाजार समिती समोर एका घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. तर न्यायालयासमोर देखील मोठ झाड रस्त्यावर पाडले आहे, वाऱ्याचा वेग अधिक असल्याने घरावरील पाण्याची टाकी देखील उडून दुसरी कडे पडली आहे. त्यामुळे अनेक भागात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.