क्षुल्लक कारणावरून १० जानेवारी १९ रोजी दोन चिमुरड्याचे अपहरण करून फेकले होते विहिरीत
अमळनेर (प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील धानोरा येथील दोन चिमुरड्याचे क्षुल्लक कारणावरून अपहरण करून त्यांना विहिरीत फेकून त्यांची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना १० जानेवारी १९ रोजी घडली होती. याप्रकरणी शेख खालिद शेख इस्माईल या नराधमाला जिल्हा सत्र न्या. राजीव पांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावून खडी फोडायला पाठवले. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विडीओ कॉन्फरन्स द्वारे ही शिक्षा सुनावली.
या बाबत माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील धानोरा येथील शेख खालिद शेख इस्माईल वय ३५ याचे शेजारी मेहबूबखन याच्याशी घरोब्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे येणे जाणे होते. मात्र तो मुलीशी जास्त बोलत असल्याने हे मेहबूबच्या पत्नीला आवडत नव्हते. त्याला हटकल्यामुळे त्याला राग आला होता. १० जानेवारी १९ रोजी मेहबूबखान बाहेर बाजारात गेला असताना त्यांच्या पत्नीने कळवले की मुलगी निजबा उर्फ मिजबा (वय ५) व तन्वीर खान (वय ६) हे बेपत्ता आहेत. त्यानंतर ते दोघे मुलांना शोधायला निघाले असता गावातील चेतन पवन महाजन व शेख अकबर शेख यांनी सांगितले की, तुमच्या मुलांना शेख खालिद याने बोरे खायला बिडगाव रस्त्यावर घेऊन गेला आहे पोलीस पाटील दिनेश पाटील यांनी आरोपीची विचारपूस केली असता त्याने मुलांना विहिरीत फेकून दिल्याचे सांगितले.
मुलांची एक चप्पल विहिरीबाहेर व दुसरी विहिरीत होती तरंगत, दुसर्या दिवशी काढले होते मृतदेह
विहिरीला भरपूर पाणी होते मुलांची एक चप्पल विहिरीबाहेर पडली होती व दुसरी विहिरीत तरंगत होती गावकऱ्यांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी पाणी उपसून प्रेत बाहेर काढण्यात आले होते. मेहबूबखन याच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस स्टेशनला अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती. अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने मुलीवर अत्याचार करून विहिरीत फेकल्याचे समजले.
खटल्यात सरकारी वकील अॅड. राजेंद्र चौधरी यांनी १० साक्षीदार तपासले
हा गुन्हा अमळनेर येथील सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अॅड. राजेंद्र चौधरी यांनी १० साक्षीदार तपासले. त्यात प्रत्यक्षदर्शी चेतन महाजन अकबर शेख यांनी साक्ष ग्राह्य धरून न्या. राजीव पी. पांडे यांनी आरोपीस भादवी कलम ३०२ प्रमाणे जन्मठेप व ५ हजार दंड न भरल्यास १ वर्षे शिक्षा तर कलम ३६३ अपहरण प्रकरणी ५ वर्षे शिक्षा 3 हजार रुपये दंड व न भरल्यास ६ महिने शिक्षा तर पुरावा नष्ट केला म्हणून कलम २०१ प्रमाणे ३ वर्षे शिक्ष व १ हजार रुपये दंड अशी शिक्ष सुनावली आहे आरोपी जिल्हा कारागृहात होता कोरोनामुळे व्ही सी द्वारे ही शिक्षा सुनावण्यात आली.