अयोध्येत उत्खननात सापडलेल्या प्राचीन बुध्द मुर्तीचे अवशेष जतन करण्याची मागणी

अमळनेर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका युनिटच्या माध्यमातून राष्ट्रपतींना दिले निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी)अयोध्येत उत्खननात सापडलेल्या प्राचीन बुध्द मुर्तीचे अवशेष नष्ट नकरता जतन करावेत, आशी मागणी अमळनेर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका युनिटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले आहे.
अयोध्येत सुरू असलेल्या उत्खननात प्राचीन बुद्ध कालीन मुर्त्या सह ताम्रपट सारखे अनेक अवशेष सापडत आहे मात्र तेथील सरकार हे अवशेष नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुरातत्व विभागाला हाताशी धरून हे काम करीत आहे. अयोध्येची भूमी ही प्राचीन बुध्दकालिन साकेतनगरी असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी बुध्दिस्ट इंटरनॅशनलचे तालुका अध्यक्ष ए. एम. मोरे, उपाध्यक्ष प्रा. सुनिल वाघमारे, योगराज संदानशिव, सहसचिव अजय भामरे, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, देवदत्त संदानशिव, संजय मरसाळे, विजय गाढे, जयंतलाल वानखेडे, संतोष पाटील, ज्ञानेश्वर निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *