जळगाव-धुळे जिल्हा बॉर्डरवरील बाम्हणे गाव कोरोनाबाबतीत सुरुवातीपासून आहे सजग

नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग करून, मास्क, डेटॉल साबण, आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचेही वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव-धुळे जिल्हा बॉर्डरवर असलेल्या बाह्मणे गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सुरुवातीपासूनच सावधगिरीसाठी उपाययोजना सुरू आहेत. एप्रिल महिन्यात नागरीकांना घरोघरी मास्क वाटप व हॅन्डवॉश करण्यासाठी डेटॉल साबण चे वाटप करण्यात आले होते. यामुळे गाव कोरोनापासून लांब राहिले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वेळोवेळो जनजागृती केली जात असुन नागरिकांच्या मनातील कोरोना विषयीची भिती दुर करून व हा रोग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी हे समजावून सांगितले जात आहे त्यासाठी एकेमकांमध्ये सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटाईझरचा वापर याच महत्व पटवून देउन खबरदारीच्या सुचना ही केल्या जात आहेत व आपणच आपले रक्षक ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात आणून दिली जात आहे. आता सध्या ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग, पल्स ऑक्सोमीटर द्वारे घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे व दररोज माहिती अपडेट केली जात आहे, त्याचं बरोबर संपूर्ण गावात नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आयुष मंत्रालयाने सुचविलेले आर्सेनिक अल्बम ३० चे वाटप सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. संपुर्ण गावाची आज पर्यंत सहा वेळा फवारणी करून गाव सँनेटराईझ करण्यात आले आहे. या सर्व कामासाठी लोकनियुक्त सरपंच प्रविण ओंकार पाटील, उपसरपंच प्रकाश राजाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश धर्मराज भामरे, युवराज गंभीर पाटील, रविताबाई भैय्यासाहेब पाटील, संगीताबाई शरद पाटील, मंगलाबाई रमेश पाटील, सरलाबाई मंगा भिल, ग्रामसेवक अभिजित देवरे, अंगणवाडी सेविका प्रमिलाबाई हिरालाल पाटील, आशावर्कर शारदा पाटील, ग्रामपंचायत शिपाई अधिकार पाटील व संपुर्ण ग्रामस्थ मंडळ परिश्रम घेत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी धुळे जिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांवर घातले निर्बंध

बाह्मणे गाव जळगाव-धुळे जिल्हा बॉर्डर वर शेवटचे गाव असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील अनेक नागरिक चोरवाटाद्वारे गावातुन जळगाव जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने लॉकडाऊन काळात संपुर्ण ग्रामस्थांच्या मदतीने कडक पाउलं उचलत गावाच्या संपुर्ण सीमा बंद केल्या व प्रशासनाचे संपुर्ण नियमांचे काटेकोरपणे पालन केले. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना आठवडाभर जि.प. शाळेत किंवा घरात काँरंनटाईल करण्यात येत असुन बाहेरून येणाऱ्या लोकांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात आहे.

या अधिकाऱ्यांचे मिळाले गावाला सहकार्य

ग्रामपंचायतीस केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाने अमळनेरच्या प्रांत अधिकारी सीमा अहिरे, तहसिलदार मिलिंद वाघ, पंचायत समिती बि.डी.ओ. संदीप वायाळ व मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.सागर पाटील व आरोग्य साहाय्यक मोहन धनगर आधी सर्व अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *