पाणीदार आनोरे गावात संपन्न झाला आदर्श विवाह..
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाने लग्न समारंभांवर चांगलाच चाप आणला आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून विवाह साहोळे पार पडत असले तरी अमळनेर तालुक्यातील पाणीदार गाव म्हणून ओळख असलेल्या आनोरे येथील नवरदेवाने गावात वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी ५ हजार रुपये देऊन पर्यावरण जागृतीचा संदेश देत खऱ्या अर्थाने आदर्श विवाह पार पाडला.
अमळनेर तालुक्यातील आदर्श पाणीदार आनोरे गावात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कै. मुरलीधर पुंडलीक पाटील यांचे चिरंजीव गणेश आणि सखाराम मगन बोरसे यांची कन्या पूनम यांचा आदर्श विवाह झाला. या प्रसंगी सोशल डिस्टन्सिंगचे आवश्यक ते नियमांचे पालन करत अनावश्यक खर्च टाळत छोटेखानी विवाह समारंभ उत्साहात झाला. आपल्या विवाह निमित्ताने व वर पिता कै. मुरलीधर पुंडलीक पाटील यांच्या स्मरणार्थ गणेश याने गावाच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून आनोरे विकास मंच यास वृक्ष लागवड व संवर्धनासाठी ५००० रुपयांचा धनादेश दिला. ऐरवी लग्न समारंभात वधू-वरांना आर्शीवदाने आर्थिक किंवा भांड्यांचा आहेर करून मदत केली जाते. परंतु गणेश याने वृक्षलागवडीसाठी ५ हजार रुपये एक चांगली प्रथा यानिमित्ताने रूढ केली आहे.