अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गोवर्धन येथे गुरुवारी दि. ११ रोजी आदर्श विवाह सोहळा पार पडला. तालुक्यातील विविध मान्यवरांनी या आदर्श सोहळ्यास भेट देऊन वधू वरांना आशिर्वाद दिले. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित वऱ्हाडींनी सोशल डिस्टन्सिंग पाळले.
गोवर्धन येथील रहिवासी व अमळनेर पंचायत समितीचे लिपिक अनिल पाटील यांची कन्या माधुरी व करणखेडा येथील वसंतराव कौतिक पाटील यांचे सुपुत्र किरण यांचा विवाह सोहळा दि..३ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र लॉकडाऊनमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर समाजात होत असलेल्या आदर्श सोहळ्याची प्रेरणा घेऊन वधुपिता अनिल पाटील यांनी मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याचा विचार मांडला. या प्रस्ताव वर वरांकडील मंडळीनी होकार दिल्याने दि. ११ जुन रोजी हा सोहळा पार पडला. या वेळी आमदार अनिल पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, विस्तार अधिकारी चिंचोले, विस्तार अधिकारी राणे, ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, संचालक देविदास पाटील, ग्रामसेवक दिनेश साळुंखे, सरपंच उमेश साळुंखे, सरपंच गजानन शिंदे यासह अन्य मान्यवरांनी भेट देऊन आशिर्वाद दिले. तसेच सर्व मान्यवरांनी या आदर्श सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल वधू व वराकडील मंडळींचे कौतुक केले.