बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्यांना अलगद बाहेर काढण्यासाठी शोधले “अनमोल” असे तंत्र

लोंढवे येथील विद्यार्थी अमोल पाटील याचा अभियांत्रिकीचा उत्कृष्ट अविष्कार
उपकरणाच्या पेटंटसाठी केला अर्ज, संशोधनात रोवला एक मानाचा तुरा

अमळनेर (प्रतिनिधी) धरतीच्या कुशीत खोदलेल्या उघड्या बोअरवेलमध्ये पडलेल्या आपल्या काळजाच्या तुकड्याला अलगद काढण्यासाठी तालुक्यातील लोंढवे येथील अमोल पाटील या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने त्याच्या सहकाऱ्यांनी अत्यंत उपयुक्त असे उपकरण तयार केले आहे. यामुळे पैसा आणि वेळेची बचत होऊन बोअरवेलमध्ये पडलेले मुल सुखरुप बाहेर काढता येणार आहे. विशेष म्हणजे त्यांनी या उपकरणाच्या पेटंटसाठी अर्जही केला असून हे उपकरण एक वरदान ठरणार आहे. म्हणून अमोल याच्या या अनमोल संशोधनामुळे आपल्यागासह अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात संशोधनाचा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
लोंढवे येथील अमोल संजीव पाटील हा लोनावळा येथील सिंहगड इंन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी  इंजीनियरिंगच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रा. श्रीमती डी .के शेंडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आणि त्याचे सहकारी सौरव सैदाने, अनिकेत शिंदे ह्या विद्यार्थ्यांनी बोरवेलच्या खड्यात पडलेल्या मुलांना वाचवण्याच्या शोधन पद्धतीच्या उपक्रमावर अभ्यास सुरू केला होता. त्यात त्यांनी अवघ्या सहा महिन्यात यश मिळवत अभिनव असे तंत्र शोधून उपकरण तयार केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी या उपकरणाच्या पेटेंटसाठी अर्जही केला आहे. बोरवेल मधील पडलेल्या मुलाना वाचवण्यासाठी हे तंत्र खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. उघड्या बोरवेलमधे मुले पडण्याच्या अनेक घटना देशात घडत असतात. सद्याच्या बचाव कार्यमध्ये , बोरवेलच्या बाजूला एक मोठा खड़ा तयार केला जातो , आणि बोरवेलमध्ये समांतर छिद्र केले जाते. पण सद्याच्या ह्या तंत्राचा वापर अत्यंत किचकट असून या वेळ, पैसा , मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागत असते. तरीही बऱ्याचवेळा यश येत नाही. अशावेळी अमोल पाटील ह्यानी शोधलेले तंत्र आणि उपकरण अत्यंत महत्वपूर्ण  ठरणार  आहे.

मोटर्स, सेंसर आणि कॅमेराचा वापर करून तयार करेले लाईव्ह उपकरण

या उपकरणामध्ये अनेक प्रकारच्या मोटर्स आणि सेंसर वापरले आहेत . शिवाय कॅमेराचासुधा वापर करण्यात आला आहे. हे उपकरण दंडगोलाकर असून त्यात धातूच्या वर्तुळ पुष्ठभाग वापरण्यात आला आहे. तसेच ह्या उपकरणात यांत्रिक हाथ बसवण्यात आले आहे. त्यात  हवेच्या पिशव्याही जोडण्यात आले आहेत. यांत्रिक हाथ अलगदरित्या मुलाला पकडून उचलेल व हवेच्या पिशव्या कवचाचे काम करेल. हे उपकरण स्टँड अणि दोरीच्या सहाय्याने बोरवेलच्या आतमध्ये सोडले जाते.

दोन टप्प्यात ३० ते ४० मिनिटातच पूर्ण केले जाते अवघड बचाव कार्य

हे बचाव कार्य दोन टप्प्यात पार पाडले जाते. पहिल्या टप्यात सेंसर अणि कॅमेराच्या सहाह्याने सर्वे केला जातो. ह्या वेळी हवेचा दाब , ऑक्सिजनचा पुरवठा व मुलाच्या परिस्थिची माहिती घेतली जाते. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष बचाव कार्याला सुरुवात होते. हे यंत्र बोरवेलमध्ये पडलेल्या मुलास बाहेर काढण्यास येते, या उपकरणामुळे बचावकार्य ३० ते ४० मिनिटात पूर्ण होईल .कॅमेराच्या वापरामुळे लाइव  व्हिडिओ पाहून परिस्थिती नियंत्रणात ठेवता येइल. यात पैसा व मनुष्यबळ कमी लागेल. असे अमोल पाटील यांने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *