खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

एकेमकांमध्ये सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटाईझरचा वापर करून कोरोनाला हरवून

आमदार अनिल पाटील यांनी शहापुर, शेवगे येथे जाऊन नागरिकांना दिला आत्मविश्वास

अमळनेर (प्रतिनिधी) एकेमकांमध्ये सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटाईझरचा वापर करून कोरोनाला हरवून आपन विजय मिळवू असा आत्मविश्वास आमदार अनिल पाटील यांनी शहापूर आणि शेवगे येथे भेट देऊन नागरिकांना दिला.
अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे व पारोळा तालुक्यातील शेवगे येथे कोरोना रुग्ण आढळल्यानंतर गावात भितीचे वातावरण पसरले होते. आमदार अनिल  पाटील यांनी गावांला भेट दिली व नागरिकांच्या मनातील कोरोना विषयीची भिती दुर केली, व हा रोग कसा चांगला होणार आहे याबाबत समजावून सांगितले. त्यासाठी एकेमकांमध्ये सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटाईझरचा वापर याच महत्व पटवून देउन खबरदारीच्या सुचना ही केल्या. आपणच आपले रक्षक ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात आणून दिली.

एकतास गावाला सावधगिरीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव ३ दिवस लॉकडाऊन

तसेच शहापुर येथे कोरोना रुग्ण आढळल्यानंतर शेजारील एकतास गावाला सावधगिरीचा उपाय म्हणुन संपूर्ण गाव ३ दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्या प्रसंगी एकतास गावाला सुद्धा आमदारांनी भेट देवुन पाहणी करून माहिती घेतली व प्रशासनाचे नियम पालन करून लॉकडाऊन पाळा व सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटाईझरचा वापर करा ह्या खबरदारीच्या सुचना केल्या. त्या प्रसंगी एकतास येथे सरपंच मंगलाबाई साहेबराव पाटील, माजी सरपंच साहेबराव पाटील, पोलीस पाटील बापुराव नामदेव मोरे, ग्रामसेवक जे.डी.पवार, शहापुरचे पोलीस पाटील भाऊसाहेव पाटील, ग्रामसेवक समाधान कोळी, मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स व कर्मचारी तसेच शेवगे येथे सरपंच आशाबाई सुभाष पाटील, पोलीस पाटील संभाजी नथ्थु पाटील, सदाशिव सुभाष पाटील, ग्रामसेविका नितल पाटील आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button