स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

महत्वपूर्ण नारे (slogans)

1. जय जवान जय किसान
►- लाल बहादुर शास्त्री

2. मारो फिरंगी को
►- मंगल पांडे

3. जय जगत
►- विनोबा भावे

4. कर मत दो
►- सरदार बल्लभभाई पटले

5. संपूर्ण क्रांति
►- जयप्रकाश नारायण

6. विजय विश्व तिरंगा प्यारा
►- श्यामलाल गुप्ता पार्षद

7. वंदे मातरम्
►- बंकिमचंद्र चटर्जी

8. जय गण मन
►- रवींद्रनाथ टैगोर

9. सम्राज्यवाद का नाश हो
►- भगत सिंह

10 स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है
►- बाल गंगाधर तिलक

11.इंकलाब जिंदाबाद
►- भगत सिंह

12. दिल्ली चलो
►- सुभाषचंद्र बोस

13. करो या मरो
►- महात्मा गांधी

14. जय हिंद
►- सुभाषचंद्र बोस

15. पूर्ण स्वराज
►- जवाहरलाल नेहरू

16. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान
►- भारतेंदू हरिशचंद्र

17. वेदों की ओर लौटो
►- दयानंद सरस्वती

18. आराम हराम है
►- जवाहरलाल नेहरू

19. हे राम
►- महात्मा गांधी

20. भारत छोड़ो
►- महात्मा गांधी

21. सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल में है
►- रामप्रसाद बिस्मिल

22.सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा
►- इकबाल

23. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा
►- सुभाषचंद्र बोस

24. साइमन कमीशन वापस जाओ
►- लाला लाजपत राय

25. हू लिव्स इफ इंडिया डाइज
►- जवाहरलाल नेहरू✍भारत-चीनचा सीमाविवाद:
भारताची 3488 किलोमीटरची सीमा चीनला लागून आहे.

⚫LAC (Line Of Actual Control):
भारत ३,४८८ किमी लांबीची सीमा मानतो, तर चीन फक्त ती २,००० किमी लांबीची आहे असे मानतो.

⚫पूर्वेला -अरुणाचल प्रदेश,सिक्कीम
⚫मध्यला -उत्तराखंड, हिमाचल प्रदेश
⚫पश्चिमेला -लडाख

???? पर्यटकांसाठी २५ जूनपासून खुला होणार आयफेल टॉवर ????
_____________________________________
◾️आयफेल टॉवर पर्यटकांसाठी २५ जूनपासून खुला होणार आहे.

◾️पॅरीसमध्ये आयफेल टॉवर आहे. करोनाच्या संकटामुळे आयफेल टॉवर पर्यटकांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

◾️आता आयफेल टॉवर पर्यटकांसाठी २५ जून पासून खुला होणार आहे AFP ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. एएनआयने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

. ????आयफेल टॉवर माहिती ????

◾️आयफेल टॉवरची निर्मिती १८८७ ते १८८९ या दोन वर्षांमध्ये करण्यात आली.

◾️पॅरीसमधल्या सर्वाधिक उंच टॉवरमध्ये आयफेल टॉवरची गणना केली जाते. या टॉवरची उंची ३२४ मीटर आहेत.

◾️एखाद्या ८१ मजली इमारतीएवढी या टॉवरची उंची आहे. या टॉवरच्या तीन लेव्हल आहेत. या तीन लेव्हल्सला पर्यटक भेट देऊ शकतात. या टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या लेव्हलवर रेस्तराँ आहेत.

◾️२७६ मीटरवर म्हणजेच ९०६ फुटांवर या टॉवरची तिसरी लेव्हल आहे.

◾️या ठिकाणाहून पर्यटकांना निरीक्षण करता येतं. आयफेल टॉवरला दरवर्षी साधारण ७ लाख पर्यटक भेट देतात.
_____________________________________

 ????शास्त्रीय उपकरणे व वापर????
______________________________
• स्टेथोस्कोप – हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ – भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर – प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर – हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर – द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन – पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर – विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर – समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर – वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर – ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर – हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ – हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप – सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर – दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर – रक्तदाब मोजण्याचे साधन.

__________________________________

जागतिक महासागर दिन: 8 जून

दरवर्षी 8 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक महासागर दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी हा दिवस “इनोव्हेशन फॉर ए सस्टेनेबल ओशन” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे.

महासागर आपल्या ग्रहाचे फुफ्फुस आहेत, जो आपण श्वास घेतो तो बहुतेक ऑक्सिजन प्रदान करतो. यावर्षीच्या संकल्पनेमधून शाश्वत महासागराची मानवी जीवनासाठी असलेली आवश्यकता आणि त्यासाठी नवतंत्रज्ञानाची गरज स्पष्ट करण्यात आलेली आहे

यावर्षीच्या कार्यक्रमांमध्ये तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, स्त्रोतांचे व्यवस्थापन, ग्राहक उत्पादने, वित्त आणि वैज्ञानिक शोध यासारख्या विभागांमध्ये नवकल्पनांचा शोध घेणे आणि ते कशा प्रकारे वापरासाठी आकाराला येऊ शकतात याची रूपरेषा तयार करण्यात आली.

पार्श्वभूमी

2008 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. हा दिवस 2002 सालापासून UNESCO च्या इंटरगवर्नमेंटल ओशनोग्राफीक कमिशन (IOC) यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात येतो.

जगभरातल्या महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महासागरांचे जतन आणि नैसर्गिकदृष्ट्या त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती करणे यामागे हेतू आहे.पृष्ठभाग विषाणूरहित करण्यासाठी ARCI आणि मेकीन्स या संस्थांनी तयार केलेले UVC आधारित निर्जंतुकीकरण कपाट

भारत सरकाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे स्वायत्त संशोधन व विकास केंद्र असलेले आंतरराष्ट्रीय चूर्ण धातुशास्त्र आणि नवीन सामग्री प्रगत संशोधन केंद्र (ARCI) येथील संशोधकांनी हैदराबादची मेकीन्स या कंपनीच्या सहकार्याने कोविड-19 विषाणूमुळे होणारा पृष्ठभागांवरील दुषितपणा टाळण्यासाठी रुग्णालयातल्या अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तू, प्रयोगशाळेमधील पोशाख आणि संशोधन प्रयोगशाळांमधील PPEच्या निर्जंतुकीकरणासाठी “UV-C किरणांवर  आधारित असलेले निर्जंतुकीकरण कपाट” तयार केले आहे.

दैनंदिन संपर्कामुळे वापरात आलेल्या वस्तूंवर विषाणू सहजपणे आढळतात, जे पुढे शरीराच्या संपर्कात आल्याने त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत वस्तूंचे निर्जंतुकीकरण होणे अत्यावश्यक असते. त्यामुळे हा शोध महत्वाचा ठरणार आहे.

याचा वापर व्यवसायिक आस्थापनांमध्ये आणि बऱ्याच देशांतर्गत वस्तूंमध्ये ग्राहकांना दाखविलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

254 nm (नॅनोमीटर) एवढी तरंगलांबी असलेली UV-C प्रकाशकिरणे विषाणूसाठी धोकादायक असतात आणि ते निष्क्रिय होतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *