कोरोनाने विद्यार्थी संख्या कमी होणार असल्याने पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षकांची धावपळ

सरप्लस होण्याची भीती असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पळवापळवीचा खेळ सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमी विद्यार्थी संख्या कमी होणार असल्याने शिक्षकांना सरप्लस होऊ होण्याची भीती असल्यामुळे शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. यातून मुलांना आणि पालकांना वेगवेगळी आमिष दाखवून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेला या खेळाने शिकण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाने पूर्ण जगात थैमान घातले आहे. यामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यात आता पवित्र असलेले शिक्षण क्षेत्रही सुटले नाही. त्यात गेल्या १० वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वाढला आहे. आपल्या पाल्याला पूर्ण इंग्रजी माध्यमातून शिकवण्याकडे पालकांची मनोभूमिका पूर्णपणे तयार झाली आहे. त्याशिवाय पालकांमधील जागरूकता शासनाच्या प्रयत्नामुळे जन्मदर कमी झाला आहे. जोडप्यांना केवळ एकच अपत्य आहे. त्यामुळेसुद्धा विद्यार्थी संख्या कमी आहे. ग्रामीण भागातून पूर्वी शहरात विद्यार्थी येत होते. आताही येतात. मात्र, त्यांची संख्या कमी झाली आहे. बहुतांश गावांमध्येसुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत आहेत.
त्यामुळे तेथील विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या सर्व कारणांमुळे खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थी कमी होत आहेत. यासह कोरोनामुळे  विद्यार्थी शाळेत येईनात अशी अवस्था आहे. रेड झोन मधील शाळांची अडचण अद्याप आहे.मात्र ग्रामीण भागात व शहरी भागात रेड झोन नसलेल्या शहरी भागात शाळा सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या टिकून राहावी व शिक्षकांचे भविष्य यावर असणारे शिक्षक सरप्लस होऊ नये यासाठी हे काम सुरू झाले आहे.

ग्रामीण भागात शिक्षकांची सुरू झाली पायपीट

आपल्याशाळेत विद्यार्थी शिकण्यासाठी आला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, दप्तर, पाणी बॉटल यांची आमिषे दाखवली जात आहेत. याशिवाय विद्यार्थी आणण्यासाठी ग्रामीण भागात त्याच गावातील वाहने भाड्याने लावणे, त्याचा पैसा सरप्लस होणार्‍या शिक्षकांकडून घेणे.
पालकांचेभाव वधारले – ज्याच्याघरी पहिल्या आणि पाचव्या वर्गासाठी विद्यार्थी आहेत, त्या पालकांचे भाव वधारले आहेत. या पालकांना भेटण्यासाठी विविध प्राथमिक माध्यमिक शाळांचे शिक्षक प्रयत्न करत आहेत. तर शहरात व परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा विविध अभ्यासक्रम घेऊन दाखल होत आहेत. त्यात आपल्या पाल्याचा नंबर लागावा यासाठी पालक धावत आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु असले तरी १६ जूनपासून ग्रामीण भागात रेड झोन वगळता शाळा उघडत आहेत.

अशी आहे शाळांची संख्या

पालिका मराठी शाळा – १
विद्यार्थी संख्या – ३३
उर्दू शाळा – ४
खाजगी मराठी शाळा – १७
खाजगी इंग्रजी शाळा – ४
खाजगी उर्दू शाळा – ७

शाळा वाचविण्यासाठी सर्वच शिक्षकांची कसरत

दरवर्षी सर्वेक्षण, घरोघरी जाऊन पालकांचे समुपदेशन करून संख्या वाढविणे व टिकवून ठेवणे आदी कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्यामुळे शाळा वाचविण्यासाठी सर्वच शाळांच्या शिक्षकांची कसरत सुरु आहे.रवींद्र पाटील, शिक्षक पालिका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *