शहापूर येथे ८ तर कावपिंप्रीत २ दोन रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागालाही विळखा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात पुन्हा कोरोनाने कहर केला आहे. एकाच दिवशी बुधवारी तब्बल ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यात रुग्णांची संख्या २१० झाली असून मृतांची संख्या २२ झाली आहे. तर व्यापारी , ग्रामीण भागातील डॉक्टर, हॉटेल चालक , दुकानदार आदींचा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश असल्याने संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
काही दिवसांच्या शांततेनंतर अमळनेरात कोरोनाने डोके वर काढून द्विशतक ओलांडले आहे. बाजारपेठ सुरळीत झाल्यानंतर संसर्ग ग्रामीण भागापर्यंत पोहचला आहे. शहापूर गावात ९ रुग्ण झाले आहेत तर कावपिंप्री येथे ३ रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४२ रुग्ण अमळनेर कोविड सेंटरला उपचार घेत आहेत व ३५ रुग्ण जळगाव , चोपडा , नाशिक येथे उपचार घेत आहेत.
बुधवारी आढळून आलेले रुग्ण असे
बुधवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहापूर येथील ८ , ग्लोबल स्कूल जवळील १ , पान खिडकी भागातील ४ , साई गजानन नगर पैलाड भागातील २ , सिद्धार्थ चौक गांधलीपुरा भागातील ८ , जपान जीन मधील १, मिलचाळ भागातील २ , बाहेरपुरा १ , कावपिंप्री २, गोपालचौक बोरसे गल्ली २ आणि सराफ बाजारातील ४ अशा ३४ लोकांचा समावेश आहे.