पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने टाकली धाड
अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील कामतवाडी येथील गुरुकृपा किराणा दुकानावर सुरू असलेली अवैध गुटखा विक्रीवर पोलिसांत अवकृपा करीत धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत पथकाने १९ हजार ९७० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कामतवाडी येथील विजय गोकुळ पाटील यांच्या किरानादुकानातून १९ हजार ९७० रुपये किमतीचा गुटखा अमळनेर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, दीपक विसावे, दीपक माली, भूषण बाविस्कर आदींनि कामतवाडी येथे जाऊन विजय पाटील याच्या गुरुकृपा दुकानात धाड टाकून ही कारवाई केली आहे. हा दुकानदार गुटख्याची साठवणूक करून गावात विक्री करत असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. विजय पाटील याच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास दीपक वसावे, आणि भटूसिंग तोमर करीत आहेत.