अनिल पाटील यांनी स्वतः रक्तदान करून युवकांना केले प्रोत्साहित, कोरोनातील मृतांना श्रध्दांजली
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रक्तदान शिबीर आणि ध्वजारोहण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार अनिल पाटील यांनी स्वतः कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करून कार्यकर्ते व युवकांना प्रोत्साहित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवक कार्यकर्त्यानी देखील रक्तदानाचा संकल्प करून जास्तीत जास्त बाटल्या रक्त संकलित करण्याचा निर्धार व्यक्त केला. कोरोना काळात मृत पावलेल्या नागरीकांनाही यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली तर शासकीय व प्रशासकीय सेवेतील कोरोना योद्धांनी बजावलेल्या स्तुत्य कार्याबद्दल पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला. या प्रसंगी जि.प.सदस्यां जयश्री अनिल पाटील, जळगाव जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमाताई पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय प्रदेश समन्वयक सौ रिता बाविस्कर, महिला प्रदेश सचिव रंजना देशमुख, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष बाळू पाटील, महिला तालुकाध्यक्षा योजनाताई पाटील, शहराध्यक्षा आशाताई चावरीया, महिला शहर उप्पाध्यक्षा अलका पवार, प्रदेश प्रतिनिधी शिवाजीराव पाटील (दाजभाऊ), कामगार नेते एल.टी.नाना पाटील, बाजार समिती संचालक विजय पाटील, पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, नगर सेवक दिपक पाटील, नगरसेवक विवेक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय भिला पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उप्पाध्यक्ष गौरव पाटील, विनोद कदम सर, शिंदे सर, राहुल पाटील सर, भैय्यासाहेब पाटील, पंकज पाटील, माजी शहराध्यक्ष रणजित पाटील, हिंमतराव पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे अबिद मिस्तरी, रफिक मिस्तरी, मुशीर शेख, रफिक शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष भुषण भदाणे, राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रमुख राहुल गोत्राळ, राष्ट्रवादी युवक पदाधिकारी सनी गायकवाड, अभिषेक ठमाळ पंकज पाटील, गौरव पाटील, सागर सोनार, वाल्मिक पाटील आदी उपस्थित होते.