कौटुंबिक वादातून घडला प्रकार, पोलिसात पत्नी आणि शालका विरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला पत्नी आणि शालकाने मारहाण करून कागदपत्रे फाडून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना ९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. यामुळे रूग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ संजय रनाळकर यांच्या पत्नी अनिता ही गेल्या चार महिन्यांपासून कौटुंबिक वादामुळे माहेरी (निजामपूर ता. साक्री) राहत होती. ९ रोजी ती आपल्या भाऊ गौरव चंद्रकांत विसपुते याला घेऊन जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन डॉ. संजय हे काम करीत असताना त्यांना मारहाण शिवीगाळ केली. तसेच त्यांची सरकरी कागदपत्रे फाडून टाकली. त्यांना डाव्या हाताला दुखापत केली. डॉ. रनाळकर यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला पत्नी अनिता आणि शालक गौरव विसपुते विरुद्ध भादवी ३५३ , ३२३ ,३२३,५०४ ,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत.