नाभिक समाजाची बदनामी करणाऱ्या विकृत विवेक लांबेला अटक करा

अमळनेर येथील समस्त न्हावी पंचमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिले निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) फेसबुकवरून नाभिक समाजास गलिच्छव अश्लिल शब्द वापरून महिलांचाही अपमान करणाऱ्या विकृत विवेक लांबे यांस अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमळनेर येथील समस्त न्हावी पंचमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.
अमळनेर येथील समस्त न्हावी पंचमंडळाने उपिभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रण आरोरात्र कार्यरत  आहे.  मजूर, कामगार लहान व्यवसायिक लॉकडाऊमुळे उपासमारीचा सामना करीत असताना विवेक लांबे या अविवेकी व्यक्तीने फेसबुकवरून अत्यंत घाणेरड्या भाषेत नाभिक समाजाविषयी पोस्ट टाकली आहे. नाभिक समाज हा शांततापूर्वक जीवन जगणारा समाज आहे. केशकर्तन हा सेवा व्यवसा करती असताना सर्वांशी मिळून मिसळून वागणार आहे. कधीही कुणाशी भांडणतंटा करीत नाही. तरीही लांबे सारखे विकृत माणसे समाजाचा आणि महिलांचा अवमानकारक पोस्ट व्हायरल करीत  आहे. त्यामुळे त्याचा समस्त न्हावी समाजबांधव निषेध करीत असून त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात यावे, अन्यथा नाभिक समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार मिलिंद वाघ, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांना देण्यात आल्या आहे. तर निवेदनावर  नंदलाल जगताप, रघुनाथ खोंडे, भिकन सैंदाणे, सूर्यवंशी, दिलीप सोनवणे, दिपक खोंडे, लहू सोनवणे,  आप्पा पगारे, प्रवीण वारूळे, महेश कुवर, अमोल सैंदाणे, प्रशांत गायकवाड, मधुकर ठाकरे, कल्पेश सोनवणे, विनोद निकम, संदीप सैंदाणे, सुभाष बोरसे, राजू सोनगिरे, जयेश जगताप, पवन सौंदाणे, दीपक बोरसे आदी समाज बांधवांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *