अमळनेर (प्रतिनिधी)अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या राज्यसदस्य पदी अरुण हिलाल पाटील पैलाडकर यांची तर खान्देश विभागीय सदस्य म्हणून प्रकाश महाराज चंदीले अमळनेर कर यांची वर्णी लागली आहे.
ह.भ.प. अरुण हिलाल पाटील पैलाड आणि जेष्ठ किर्तनकार ह.भ.प.प्रकाश महाराज चंदिले हे पारंपारिक सांप्रदायिक कार्य करतात. संताच्या विचारांचा प्रचार प्रसार करतात आणि संघटनात्म कार्य करतात. अमळनेर तालुक्यात त्यांचे विशेष कार्य आहे. संत सखाराम महाराज यांच्या सेवेत सतत तत्पर असतात.अश्या चांगल्या पध्द्तीने सामाजिक सांप्रदायिक कार्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन खान्देश विभागीय अध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज माळी उपाध्यक्ष ह.भ.प.गजानन महाराज वरसाळेकर यांनी शिफारस केली आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी ह.भ.प.अरुण महाराज पाटील पैलाडकर यांना अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या राज्यसदस्य पदी आणि ह.भ.प.प्रकाश महाराज चंदिले अमळनेरकर खान्देश विभागीय सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.