खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

अति सौम्य, लक्षण नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच क्वारंटाईन करून होतील उपचार

वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  डॉ. प्रदीप व्यास यांच्या मार्गदर्शक सूचना

अमळनेर (प्रतिनिधी) कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षण नसलेल्या व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचि डॉ. प्रदीप व्यास यांनी जीआर जाहीर केला आहे.
डॉ. व्यास यांनी काढलेल्या जिआरात म्हटेल आहे की, भारत सरकारच्या ७ एप्रिल २०२० रोजीच्या संदर्भान्वये कोविड-१९ संशयित/पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांसाठीच्या योग्य व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना यापुर्वी निर्गमित झाल्या असून, त्यानुसार सर्व संशयित (ज्यांचे प्रयोगशाळा तपासणी अहवाल प्रतिक्षेत आहेत), व पॉझिटीव्ह रुग्णांना रुग्णालयामध्ये विलगीकरणासह योग्य व्यवस्थापनाद्वारे आजाराचे संक्रमण खंडीत करण्याविषयी सुचित केले आहे.
प्रचलित मार्गदर्शक सुचनेनुसार, प्रतिबंधित कालावधीमध्ये रुग्णांना वैद्यकियदृष्टया लक्षणानुसार लक्षण नसलेले / सौम्य वा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकृत करावयाचे असून, त्यानुसार रुग्णांना अनुक्रमे कोवीड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) व) डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल (डीसीएच) येथे दाखल करावयाचे आहे. तथापि, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोवीड पॉझिटीव्ह रुग्णांना जर त्यांचे घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांचे संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय (होम आसोलेशन) उपलब्ध करून देता येईल. याकरीता  मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. यासाठी उपचार करण्याऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रुग्णास अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबदल वैद्यकियदृष्टया प्रमाणित केलेले असावे. संबधित रुग्णांच्या घरी त्यांच्या विलगीकरणासाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींकरीता अलगीकरणासाठी (होम क्वारंटाईन ) योग्य सोई-सुविधा उपलब्ध असाव्यात.
घरी दिवस-रात्र चोवीस तास  काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. संबधित काळजीवाहू व्यक्ती व उपचार देणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दुरध्वनी/मोबाईल) उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची मात्रा घ्यावी. मोबाईलवर “आरोग्य सेतू” अॅप डाऊनलोड करावे व ते सतत अॅक्टिव्ह (ब्ल्यूटूथ किंवा वायफायद्वारे) असेल याविषयी दक्ष रहावे. रुग्णांनी स्वतःची काळजी घेणे व नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्याविषयी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी/सर्वेक्षण पथकास माहिती देणे अनिवार्य आहे. रुग्णांने स्वतःचे गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र (परिशिष्ट-१) भरून द्यावे व सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर त्या व्यक्तिस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल.
निकट सहवासितांना घरी करावायाच्या अलगीकरणासाठी (होम क्वारंटाईन) सविस्तर मार्गदर्शक सूचना https://www.mohfw.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत .

वैद्यकीय मदत कधी घ्यावी..?

रुग्णांने स्वतः व काळजीवाहू व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. धाप लागणे/श्वासोच्छवासास अडथळा निर्माण होणे. छातीमध्ये सतत दुखणे/वेदना होणे. संभ्रमावस्था/शुध्द हरपणे. ओठ/चेहरा निळसर पडल्यास त्वरीत वैद्यकिय मदत घ्यावी. गृह विलगीकरण खाली ठेवलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १७ दिवसानंतर किंवा रुग्णाला लक्षणे नसेल तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवसी घेतलेला असेल तेथून १७ दिवसानंतर आणि मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर गृह विलगीकरणातून व्यक्तिस मुक्त करावे. गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोवीड-१९ साठी चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

रुग्णांची काळजी घेणाऱ्यांनी अशी घ्यावी काळजी

आजारी व्यक्तीच्या रुममध्ये काळजी घेणाऱ्या व्यक्तीने ३ पदरी मास्क वापरणे गरजेचे आहे. वापर करत असताना मास्कच्या पुढील भागास स्पर्श करून नये. जर मास्क ओला किंवा घामामुळे खराब झाल्यास तो त्वरीत बदलणे, मास्क मापल्यानंतर योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावून हात सॅनिटायझरने स्वच्छ करावेत. स्वतचा चेहरा, नाक किंवा तोंडास स्पर्श करणे टाळावे. आजारी व्यक्ती किंवा त्याच्या सभोवतावच्या वस्तूंशी संपर्क आल्यानंतर काळजी घेणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या हाताची स्वच्छता साबण व पाण्याने करावी. तसेच अन्न शिजवण्यापूर्वी व शिजवल्यानंतर, जेवनापूर्वी व जेवनानंतर तसेच शौचालयाचा वापर झाल्यानंतर किंवा जेव्हा जेव्हा हात अस्वच्छ जाल्यावर ते साबणाने किंवा पाण्याने कमीत कमी ४० सेंकंद हात स्वच्छ करावेत. जर हात कोरडे असतील तर अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करावेत. साबवण व पाण्याने हात स्वच्छ केल्यानंतर टिश्यू पेपरने कोरडे करावेत. टिश्यू पेपर उपलब्ध नसल्यास, स्वच्छ टॉवेलचा वापर करावा व टॉवेल ओला झाल्यास बदलावा. रुग्णाच्या शारिरीक स्त्रावाशी मुख्यतः थुंकी किंवा श्वसन मार्गातून उत्पन्न होणाऱ्या स्त्रावांशी थेट संपर्क टाळाला. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सभोलतालच्या वस्तूंशी थेट संपर्क टाळावा. रुग्णाला त्याच्याच खोलीत अन्न पुरवणे आवश्यक आहे. रुग्णांनी वापरेली भांडी, डिश,  टॉवेल्स हे सर्व साबण ,डिटर्जंट आणि पाण्याने स्वच्छ करावेत. हातमोजो काढल्यानंतर किंवा वापरलेल्या वस्तू हाताळल्यानंतर हात स्वचछ धुवावेत. साफसफाइ करताना किंवा रुग्णांनी पावरलेल्या पृष्ठभागाची किंवा त्यांच्या कपड्यांची स्वच्छता करताना ट्रिपल लेअर मास्कचा वापर करावा. हातमोजे घालण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर हाताची स्वच्छता करावी. काळजी घेणाऱ्या व्यक्तीने रुग्ण वेळेवर औषधोपचार घेत असल्याची खात्री करावी. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्ती व रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या आरोग्याचे स्वपरीक्षण करावे. रोज तापमानान व कोविड १९ आजारीची लक्षणे ताप, खोकला, श्वासोच्छावासास त्रास होत असल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधावा.

घरी क्वारंटाइन रुग्णांनीही अशी घ्यावी काळजी  

रुग्णांनी नियमिती ट्रिपल लेयर मेडिकल मास्कचा वापर करावा. ८ तासाच्या वापरानंतर किंवा त्याआगोदर ओला झाला असेल तर मास्क काढून टाकावा. मास्कची १ टक्के सोडीयम हायपोक्लोराइटच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण केल्यानंतरच विल्हेवाट लावाली. रुग्णांनी त्याला नेमून दिलेल्या खोलीमध्येच राहणे बंधनकारक असून त्यांनी घरातील इतर व्यक्ती विशेषतः ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, किडनी विकाराच्या व्यक्तींपासून दूर रहावे. रुग्णांनी पुरेशी झोप व जास्तीत जास्त द्रव पदार्थाचे सेवन करावे. जेनेकरून शरिरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहील. रुग्णांनी उघड्यावर खोकू अथाव थुंकू नये. त्यांनी आपल्या हाताची स्वच्छता साबण व पाण्याने कमीत कमी ४० सेकंट किंवा अल्कोहोल मिश्चित सॅनिटायझरने करावी. स्वतःच्या वस्तूंचा संपर्क इतर व्यक्तींशी येणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्णाच्या रुममधील टाईल्स व वारंपार स्पर्श होणाऱ्या वस्तू १ टक्के सोडीअम हायपोक्लोराईट द्रवाने स्वच्छ कावेत. डॉक्टरांनी दिलेल्या सूचना व औषधोपचाराचे तंतोतंत पालन कारवे. स्वतःच्या आरोग्याचे स्वररीक्षण रोज तापमानानचे नोंद घेऊन करावे. कोविड १९ आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याची माहिती संबंधित आरोग्य यंत्रणेला द्यावी, अशा सूचना केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button