मका व ज्वारीचा शासकीय खरेदीचा शुभारंभ, ३०० शेतकऱ्यांची झाली ऑनलाइन नोंदणी

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करून प्रथम असलेल्या शेतकऱ्याचाही सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी)गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या मका व ज्वारीचा शासकीय खरेदीचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करून  करून खरेदीस सुरुवात झाली. यासाठी ३०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांना बोलावण्यात येणार आहेत, अशी माहिती शेतकी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
मका व ज्वारी खरेदीचा शुभारंभ करताना प्रथम  गोवर्धन येथील शेतकरी अनिल निंबा पाटील यांचाही आमदार पाटील यांनी सत्कार केला.त्यांचा ६० क्विंटल मका मोजण्यात आला. यावेळी बाजार समिती संचालक विजय प्रभाकर पाटील , एल. टी. पाटील , शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील , नायब तहसीलदार संतोष बावणे , नायब तहसीलदार आर. डब्ल्यू. महाडिक , पुरवठा अधिकारी नाना पाटील , कर्मचारी सुभाष पाटील , भिकन पवार उपस्थित होते.

तहसीलदार मिलिंद वाघ यांनी शेतकी संघाचे २००० क्विंटल क्षमतेचे गोदाम करून दिले उपलब्ध

शासकीय भरडधान्य ज्वारी,मका रब्बी हंगाम अंतर्गत १५१४ शेतकर्‍यांची कागदपत्रे जमा करण्यात आले असून ३०० शेतकऱ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत. मात्र गोदाम नसल्याने खरेदी होत नव्हती. मात्र तहसीलदार मिलिंद वाघ यांनी तात्पुरते शेतकी संघाचे २००० क्विंटल क्षमता असणारे गोदाम उपलब्ध करून खरेदी सुरू केली आहे.

अखेर महसूल अधिकाऱ्यानी शहरातील १८०  दुकानदारांकडून प्रत्येकी १०० बारदान मागवले

दरम्यान, शासनाकडे बारदान नसल्याने देखील खरेदी करण्यास अडचण होती. अखेर महसूल अधिकाऱ्यानी १८० दुकानदारांकडून प्रत्येकी १०० बारदान मागवले आहेत. शेतकऱ्यांना पीक पेऱ्याच्या नोंदणीनुसार मक्याला हेक्टरी मर्यादा ५४ क्विंटल आणि ज्वारीला हेक्टरी साडे एकोणाविस  क्विंटल मर्यादा आहे. बारदान उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांना ऑनलाईन संदेश देऊन बोलावण्यात येईल. त्यानुसारच शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणावा, असे आवाहन शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *