खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

चेक पोस्ट,रेशन दुकान, कुटूंबसर्वेच्या कामात  कोरोना योद्धा शिक्षकही देताय यशस्वी लढा

कोरोना महामारीचे संकट रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचेही योगदान मोठे

अमळनेर (प्रतिनिधी)कोरोना महामारीचे संकट रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचेही योगदान मोठे ठरत आहे. चेक पोस्ट,रेशन दुकान, कुटूंबसर्वेच्या कामात हे कोरोना योद्धाही लढा देत आहेत. यामुळे प्रशासनास या शिक्षकांची एक मोठी मदत झाली आहे.
सुमारे शंभर वर्षानंतर संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे हे महासंकट आले आहे. या संकटाच्या काळात कोरोना रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका डॉक्टर,नर्स, पोलिस, प्रशासनातील अधिकारी , राजकीय नेतृत्व यांची राहीली आहे. यांच्या सोबतच जि.प.शिक्षकही मागे न राहता कंबर कसून चेक पोस्ट,रेशन दुकान, कुटूंबसर्वेच्या कामात मोठे योगदान दिले.अमळनेर मध्ये कोरोना रूग्ण वाढले असतांना कंटेन्मेंट दोन मध्ये सतत चौदा दिवस मोठी जोखीम स्विकारून घरोघरी जाऊन कोरोना रुग्ण शोधण्यासाठी प्रशासनास व आरोग्य विभागास मदत केली.संकटाच्या काळात कर्तव्यापासून दूर न जाता अल्पशी का असेना देशसेवा करु शकलो याचे समाधान या शिक्षकांना आहे.

सर्वेक्षणाचे १४ दिवसांचे काम पूर्ण केल्याने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी केले कौतुक

या सर्वेक्षणासाठी किरण जगन्नाथ बाविस्कर, कुणाल मुरलीधर पवार, किरण नवल पाटील, प्रेमराज पुंडलिक पवार, दिनेश रमेश मोरे, मनोहर मधुकर पाटील, सचिन सुभाष पाटील, प्रदीप अर्जुन महाजन, हिरालाल अशोक पाटील, योगेश कुमार भिलाजी पाटील, प्रशांत राजूभाई पाटील, भिकन तुकाराम पाटील, राकेश पुंडलिक शिरसाठ, विलास शिवाजी पाटील, मनोहर मुरलीधर पाटील, चेतनकुमार रघुनाथ पवार, भरत पिरण जाधव, तुषार शिवाजी देवरे आदी शिक्षकांनी सहकार्य केले. नुकतेच त्यांचे १४ दिवसांचे काम पूर्ण झाले असून प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button