खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

????Success point प्रश्न मंजुषा ????

???? देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ….. होय

1) राज्य विधिमंडळ
2) कार्यकारी मंडळ
3) संसद ✓
4) न्यायमंडळ

???? योग्य विधान ओळखा

1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे
2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे

A)1 बरोबर
B) 2 बरोबर
C) दोनीही बरोबर ✓????????
D) दोनीही चूक

???? ________ याला सहकाराचा जनक मानतात.

रॉबर्ट ओवेन✓
रॉबर्ट हूक
मायकेल ओवेन
यापैकी नाही

????आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची ‘वाट चुकलेले देशभक्त’ अशी संभावना केली ?

हिंद स्वराज संघ
हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ
हिंद स्वराज✓.
यापैकी नाही

???? भारतातून ____ हे वृत्त जाते.

कर्कवृत्त✓✓
मकरवृत्त
विषुववृत्त
कोणतेही जात नाही

⚫️ महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात ‘भाषा भवन’ बांधत आहे?

औरंगाबाद
नाशिक
पुणे
मुंबई✅✅

⚪️ भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे?

नागपूर
आर्वी✅✅
अहमदाबाद
चंद्रपूर

???? अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

सरस्वती
यमुना
शरयू✓
घंडक

????भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

A. सरदार वल्लभभाई पटेल✓
B. जी. बी. पंत
C. जी. एल. नंदा
D. लाल बहादूर शास्त्री

???? लोकसभेचे पिता ….. आहे.

A. अनंतसांणम
B. झिकीर हुसैन
C. बासमम
D. मावळणकर✓

कर्जदारांना दिलासा, हप्ता न भरण्याची मुभा तीन महिन्यांनी वाढवली

???? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले. रेपो रेट कमी करण्याबरोबर कर्जदारांना त्यांनी मोठा दिलासा दिला.सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचं ओझं वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.

???? आधी मार्च, एप्रिल, मे साठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल. कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे.

???? करोनाच्या संकटाचा परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाला आहे. करोनामुळे जगभरातील आर्थव्यस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रेपो दर कपातीमुळे सामान्यांना दिलास मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कर्जदारांना दिलासा, हप्ता न भरण्याची मुभा तीन महिन्यांनी वाढवली

???? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले. रेपो रेट कमी करण्याबरोबर कर्जदारांना त्यांनी मोठा दिलासा दिला.सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचं ओझं वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.

???? आधी मार्च, एप्रिल, मे साठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल. कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे.

???? करोनाच्या संकटाचा परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाला आहे. करोनामुळे जगभरातील आर्थव्यस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रेपो दर कपातीमुळे सामान्यांना दिलास मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अमेरिकेने ‘ओपन स्कायज ट्रीटी’ मधून माघार घेतली.

???? रशियाने केलेल्या कराराच्या उल्लंघनाचा खुलासा करीत संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने ‘ओपन स्कायज ट्रीटी’ या 34 देशांच्या करारामधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

???? कराराविषयी..

???? 1 जानेवारी 2002 रोजी ‘ओपन स्कायज ट्रीटी’ हा करार अस्तित्वात आला. या करारामुळे सहभागी देशांना निशस्त्र हवाई पाळत ठेवण्याची परवानगी मिळते.

???? लष्करी कारवाया आणि त्यांच्याशी संबंधित इतर बाबींची हवाई मार्गाने घेतलेल्या छायाचित्रांद्वारे माहिती गोळा करण्याची परवानगी कराराच्या स्वाक्षरीकर्त्यांना देऊन परस्पर देशांमधला विश्वास वाढविण्याच्या उपाययोजना आणि परस्पर समन्वय आणि सहकार्यामध्ये सुधारणा करणे हा कराराचा मुख्य उद्देश आहे.

???? लिथुयानिया, स्लोव्हाकिया, इटली, रशिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, हंगेरी, डेन्मार्क (ग्रीनलँडसह), टर्की, झेक प्रजासत्ताक, रोमानिया, स्वीडन, लक्समबर्ग, बोस्निया आणि हर्जेगोविना, जर्मनी, बेल्जियम, कॅनडा, ग्रीस, नॉर्वे, आईसलँड, एस्टोनिया, फ्रान्स, ब्रिटन, जॉर्जिया, फिनलँड, लाटविया, बल्गेरिया, पोलंड, कझाकस्तान, बेलारूस, युक्रेन, स्पेन, नेदरलँड्स, पोर्तुगाल हे या कराराचे 34 सदस्य आहेत.किर्गिस्तानने या करारावर स्वाक्षरी केली आहे परंतु त्याला मंजूरी दिलेली नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

????घटनेच्या भाग 1 मध्ये “संघराज्य व त्यांची क्षेत्रे” नमूद केली आहेत.

???? भाग 1 मध्ये एकूण 4 कलमे असून या भागावर “मोहेंजोदडो आणि सिंधू” संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या ‘झेबु बैलाचे’ चित्र रेखाटले आहे.

???? पहिला भाग सुरू होतो तो लोकप्रिय indus valley च्या चिन्हे, ज्याच्यावर बैल (bull) याचे चिन्ह आढळते.

????या शिक्याची रोचकता इतिहासकारांना कोड्यात टाकण्याचे कारण म्हणजे ह्या शिक्यावरचा बैल हा तिथल्या कलाशैलीवर, कुंभारकामावर,पुतळ्यावर वारंवार आढळताना दिसते.

????तिथल्या शहरांचा उदय झाल्याचा आधीपासून ही तो शिक्का आढळण्याचे नाकारता येत नाही. आजही त्याचे अस्तित्व कायम आहे.

????हा कुबड बैल (humped- bull) प्रतीक दर्शवतो त्या ताकदीचे आणि पुरुषत्वाचं. त्यांचा कुळंयाचा रक्षण करता.

???? हे चित्र रेखाटण्याचे काम नंदलाल बोस यांचे सहकारी “कृपाल सिंग शेखावत” यांनी केले आहे.

???? लेझर क्षेपणास्त्राची अमेरिकेची यशस्वी चाचणी ????
_______________________________________
◾️हवेत झेपावणारे व विमान नष्ट करू शकणाऱ्या लेझर क्षेपणास्त्राची अमेरिकेने १६ मे रोजी पॅसिफीक महासागरात यशस्वी चाचणी घेतली.

◾️यूएसएस पोर्टलँड या नौदलाच्या युद्धनौकेवर ही  चाचणी पार पडली.

हे  जहाज वाहतुकीसाठी वापरले जाते. ते एका बंदरापाशी होते. ते  पाण्याप्रमाणेच जमिनीवरूनही जाऊ शकते.

◾️ उच्च उर्जा असलेले घन स्वरुपातील लेझरचे अव्वल दर्जाचे क्षेपणास्त्र प्रथमच यशस्वीरित्या सोडण्यात आले. त्याद्वारे ड्रोन विमान भेदले गेले आणि त्यास आग लागल्याचे छोट्या व्हिडिओवरून दिसले.
___________________________________

अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेच्या नऊ उपाययोजना

22 मे 2020 रोजी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या आणि अनिश्चित काळात वित्तीय ओघ सुरळीत ठेवण्यासाठी आणि वित्तीय स्थैर्य राखण्यासाठी नव्या नऊ उपाययोजना जाहीर केल्या.

????रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची कपात करत हा दर 4.4 टक्क्यांवरून 4 टक्के केला. सीमांत स्थायी सुविधा दर (MSF) आणि बँक दरात कपात करून हा दर 4.65 टक्क्यांवरून 4.25 टक्के करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो दर 3.75 टक्क्यांवरून 3.35 टक्क्यांवर केला आहे.

????परवडणाऱ्या दरात लघू उद्योगांना वाढता पत पुरवठा शक्य व्हावा यासाठी RBIने 17 एप्रिल 2020 रोजी भारतीय लघू उद्योग विकास बँक (SIDBI) यासाठी 90 दिवसांसाठी 15,000 कोटी रूपयांची विशेष पुनर्वित्त सुविधा जाहीर केली होती. ही सुविधा आता आणखी 90 दिवसांनी वाढवण्यात आली आहे.

????वॉलंटरी रिटेन्शन रूट (VRR) ही RBIने परकीय पोर्टफोलीओ गुंतवणुकीसाठी पुरवलेली खिडकी असून उच्च गुंतवणुकीसाठी सुलभ नियम याद्वारे पुरवले जातात. मान्यता दिलेल्या गुंतवणुक मर्यादेपैकी किमान 75 टक्के गुंतवणूक तीन महिन्यात केली पाहिजे, असा नियम आहे. मात्र गुंतवणूकदारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा कालावधी आता सहा महिने करण्यात आला आहे.

????निर्यातदारांना माल पाठवण्यापूर्वी आणि माल पाठवल्यानंतरच्या काळासाठी बँकांकडून निर्यात पत करिता असलेला एक वर्षाचा काळ, आता 15 महिने करण्यात आला आहे. 31 जुलै 2020 पर्यंत वितरीत केलेल्या मालासाठी हा नियम लागू राहणार.

????भारताच्या परकीय व्यापाराला वित्त पुरवठा करण्यासाठी, सुलभता आणण्यासाठी, चालना देण्यासाठी भारतीय निर्यात-आयात (EXIM) बँकेला 15,000 कोटी रुपयांचे कर्ज जाहीर करण्यात आले आहे. 90 दिवसांसाठी ही कर्ज सुविधा देण्यात येणार असून ती एक वर्षाने वाढवण्याची तरतूदही आहे. परकीय चलन संसाधन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बँकेला हे कर्ज दिले जाणार आहे.

????भारतात नेहमीच्या आयातीसाठी (सोने/हिरे आणि मौल्यवान धातू/ जडजवाहीर वगळता) आयात देयकासाठीचा सहा महिन्याचा काळ, आता माल पोहचवण्यापूर्वीच्या तारखेपासून  बारा महिने करण्यात आला आहे. 31 जुलै 2020 किंवा त्यापूर्वी केलेल्या आयातीला  हा कालावधी लागू राहणार.

????RBIने याआधी जाहीर केलेल्या काही नियामक उपाययोजनांना आणखी 3 महिन्यांची 1 जून 2020 पासून 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या उपाययोजना आता एकूण सहा महिन्यांसाठी (1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020) लागू राहतील.

????कर्ज देणाऱ्या संस्थाना खेळत्या भांडवलासाठीची सीमा मूळ पातळीवर आणण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंतची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खेळते भांडवल चक्र मुल्यांकनविषयक उपायांना 31 मार्च 2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

????कर्ज देणाऱ्या संस्थाना खेळत्या भांडवलावरच्या लांबणीवर टाकलेल्या सहा महिन्यांच्या (1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020) काळातल्या व्याजाचे व्याज मुदत कर्जात रुपांतर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात त्याची संपूर्ण परतफेड करणे आवश्यक आहे.

????विशिष्ट कंपनी समूहाला, जास्तीत जास्त पत पुरवठा करण्याच्या बँकाच्या मर्यादेत 25 टक्क्यांरून 30 टक्के पर्यंत वाढ करण्यात आली आहे. बाजारातून पैसे उभे करण्यासाठी कंपन्यांना सध्या येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना बँकाकडून वित्त पुरवठा करता यावा यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. 30 जून 2021 पर्यंत ही वाढीव मर्यादा लागू राहणार.

????राज्यांना त्यांची देणी पूर्ण करता यावीत यासाठी राखीव म्हणून संकलित निधी ठेवण्यात येतो. यातून निधी काढण्यासाठीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. हा बदल तातडीने अंमलात येणार असून 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार.????????देशभरातील स्मार्टफोन युझर्सला Cerberus व्हायरसचा धोका; सीबीआयने जारी केला अलर्ट

????‍♂बँकींगसंदर्भातील माहितीला धोका; इंटरपोलच्या माहितीनंतर सीबीआयने जारी केला अलर्ट

????स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज असल्याचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयने देशभरातील राज्यांना एक इशाराच जारी केला आहे. यामध्ये सीबीआयने राज्यातील पोलीस खात्यांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी एका मालवेअरवर (व्हायरस) लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने हा इशारा जारी केला आहे.

???? करोनासंदर्भातील माहिती आणि लिंक असल्याचे सांगून अनेक स्मार्टफोनमधून सर्बेरस (Cerberus) या ट्रोजनच्या माध्यमातून खासगी माहिती चोरली जात आहे.

????फिशींग (phishing) प्रकारच्या या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जाते असं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील इशारा मंगळवारी सीबीआयने जारी केल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

????कोरोनाच्या नावाखाली फसवणूक
मंगळवारी सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे अ‍लर्ट जारी करण्यात आल्याचे म्हटले आहे. बँकिंगशी सबंधित सर्बेरस (Cerberus) या ट्रोजनसंदर्भात हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. करोनामुळे जगभरामध्ये दहशत असल्याने याचा गैरफायदा काही हॅकर्स घेताना दिसत आहे. करोनासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अनेकजण इंटरनेटवरील वेगवेगळे लेख आणि संशोधनासंदर्भातील लेख वाचत असल्याचे दिसून येत आहे. याच ट्रेण्डचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशातून सर्बेरसचा वापर केला जात आहे.

????कसा पसरवला जातो हा व्हायरस
सर्बेरसच्या माध्यमातून करोनासंदर्भातील काही काही एसएमएस स्मार्टफोन युझर्सला पाठवले जातात. करोनासंदर्भात अधिक अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता स्मार्टफोन युझर्समध्ये आहे हे मागील काही महिन्यांच्या डेटावरुन स्पष्ट होत आहे. याच पार्श्वभूमीवर करोनासंदर्भातील रंजक आणि महत्वाची माहिती असल्याचे भासवून अधिक वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास मेसेजमधून सांगितले जाते. हा मेसेज खोटा असून तो स्मार्टफोनसाठी धोकादायक आहे याबद्दल काहीही माहिती नसल्याने युझर्स या लिंकवर क्लिक करतात. लिंकवर क्लिक करताच ट्रोजन स्मार्टफोनमध्ये इन्सॉटल होतो.

????अज्ञात सर्व्हरवर जातो डेटा
सर्बेरस (Cerberus) हा ट्रोजन अंत्यत धोकादायक असल्याचे तज्ज्ञ आणि सायबर सुरक्षेसंदर्भातील ब्लॉगर्स सांगतात. सर्बेरस मोबाइलमध्ये इन्सटॉल झाल्यानंतर युझर्सची खूप सारी खासगी माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. युझर्सच्या खासगी डेटाबरोबर बाकी संवेदनशील माहितीही हॅकर्सच्या हाती लागण्याची शक्यता असते असं तज्ज्ञ सांगतात. हॅकर्स सर्बेरसच्या माध्यमातून माहिती चोरुन ती एका अज्ञात रिमोट सर्व्हरवर पाठवतात असंही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

????बँकींगसंदर्भातील माहितीला धोका
स्मार्टफोन युझर्सच्या बँकींगसंदर्भातील माहितीसाठी सर्बेरस खूप धोकादायक असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. “युझर्सच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात म्हणजेच क्रेडीट/डेबिट कार्ड डिटेल्स आणि इतर महत्वाची माहिती चोरण्याचे काम हा ट्रोजन करतो. अत्यंत हुशारीने हे हॅकर्स युझर्सची खासगी माहिती आणि टू स्टेप व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून माहिती चोरुन खासगी माहिती मिळवतात,” असं सीबीआयने म्हटलं आहे????घटनेच्या भाग 1 मध्ये “संघराज्य व त्यांची क्षेत्रे” नमूद केली आहेत.

???? भाग 1 मध्ये एकूण 4 कलमे असून या भागावर “मोहेंजोदडो आणि सिंधू” संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या ‘झेबु बैलाचे’ चित्र रेखाटले आहे.

???? पहिला भाग सुरू होतो तो लोकप्रिय indus valley च्या चिन्हे, ज्याच्यावर बैल (bull) याचे चिन्ह आढळते.

????या शिक्याची रोचकता इतिहासकारांना कोड्यात टाकण्याचे कारण म्हणजे ह्या शिक्यावरचा बैल हा तिथल्या कलाशैलीवर, कुंभारकामावर,पुतळ्यावर वारंवार आढळताना दिसते.

????तिथल्या शहरांचा उदय झाल्याचा आधीपासून ही तो शिक्का आढळण्याचे नाकारता येत नाही. आजही त्याचे अस्तित्व कायम आहे.

????हा कुबड बैल (humped- bull) प्रतीक दर्शवतो त्या ताकदीचे आणि पुरुषत्वाचं. त्यांचा कुळंयाचा रक्षण करता.

???? हे चित्र रेखाटण्याचे काम नंदलाल बोस यांचे सहकारी “कृपाल सिंग शेखावत” यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button