खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

बहिणीच्या घरून घेऊन जात असताना दुचाकीला अपघात होऊन आईचा मृत्यू

निमगव्हाण ते सावखेडा तापीनदी पुलावर ट्रकने मागून धडक दिल्याने झाला अपघात

अमळनेर (प्रतिनिधी) लॉकडाऊमुळे बहिणीकडे अडकलेल्या आईला दुचाकीने घेऊन जात असताना मुलाच्या दुचाकीला मागे येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत अपघात होऊन आईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.  निमगव्हाण ते सावखेडा तापी पुलावर रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लॉकडाऊनमुळे रायाबाई दशरथ मोरे  (वय ७८) ही महिला गेल्या दोन महिन्यासासून वेले येथे मुलीकडे अडकून पडली होती. रविवारी तिचा मुलगा नारायण मोरे भिल हा त्यांना दुचाकीने (एमएच-१९, बीझेड-१०६२) घेऊन आपल्या गावीच निशाणे (ता. धरणगाव) येथे जात होता. या वेळी अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथून जवळच असलेल्या निमगव्हाण ते सावखेडा तापी पुलावर सकाळी आठ तै साडेआठ वाजेदरम्यान मागून येणाऱ्या ट्रकने ( यूपी- ४४, टी-७३४७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात रायाबाई यांचा जागीच मृ्त्यू झाला. तर नारायण हे जखमी झाले. अपघाताच्यावेळी फॉरेस्ट चेकपोष्ट नाका वरील  फॉरेस्ट कर्मचारी व चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे  होमगार्ड व पोलिसांनी मदत केली. तर चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेने पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पंचनामा केला. तसेच अपघातग्रस्त ट्रक पकडून चालकांस ताब्यात घेतले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button