खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पत्रकार आणि प्रशासनाच्या मदतीने शिरसाळे येथील ८० वर्षाच्या वृद्ध महिलेचे वाचले प्राण 

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनांच्या भीतीने आजारी असलेल्या ८० वर्षाच्या वृद्ध महिले जवळ कोणीही जात नसल्याने अखेर पत्रकार आणि प्रशासनाच्या मदतीने तिला वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले आहेत. अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथे ही दुर्दैवी घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथील केवळबाई विनायक पाटील (वय ८० ) ही महिला गावात एकटीच राहते. तिला एक मुलगा असून तो सुरत येथे कामाला आहे. मात्र लॉकडाऊन असल्याने तो गावाकडे फिरकू शकत नाही. ३ रोजी केवळबाई आजारी होती. पोलीस पाटील नाना चौधरी यापूर्वी  तिला औषध आणून देत होते. शेजारील महिला विचारपूस करत होत्या. मात्र केवळबाईची तब्येत बिघडू लागली. तिला ताप आला आणि अर्धवट बेशुद्ध  झाली. मात्र तिला कोरोना झाल्याचे वृत्त पसरल्याने तिच्याजवळ जाण्यास नागरिक घाबरत होते. तिला दवाखाण्यात नेणे , औषधी आणणे तर  दूर तिला पाणी देखील पाजायला तयार नव्हते. अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असल्याने वृद्धेच्या अंगावरचे कपडेही विस्कटले होते. म्हातारी जमिनीवर कण्हत होती.

अमळनेर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार

अखेर ३ रोजी रात्री ग्रामीण वार्ताहर व पिंपळेचे  सरपंच दिनेश पाटील याना माहिती मिळाल्यावर त्यांनी  पत्रकार संजय पाटील यांना कळवले. त्यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे आणि तहसीलदार मिलिंद वाघ याना घटना कळवल्यानंतर तहसीलदारांनी मांडळ येथील प्राथमिक आरोग्य १०८ रुग्णवाहिका मागवण्यात आली. पोलीस पाटील नाना चौधरी यांच्या मदतीने तिला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टर प्रकाश ताळे यांनी  प्राथमिक उपचार  करण्यात आलेत. परंतु महिलेची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला १०८ ने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पत्रकार आणि प्रशासनच्या मदतीने तिचे प्राण वाचले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button