कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर रोटरी क्लबतर्फे ५००० कापडी मास्क, सॅनिटायझर, धान्य वाटप 

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर रोटरी क्लबने विवीध समाज उपयोगी उपक्रम राबवून आपले सामाजिक दायित्व पार पडले आहे. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदतही केली. रोटरी क्लबने जनजागृती करत पोलीस स्टेशन, बँक , पोस्ट, फोटोग्राफर, दुकानदार यांना ५००० कापडी मास्क वाटप केले. आशा वर्कराना  व आरोग्य विभागात सॅनिटायझर, सोप स्ट्रीप वाटप केले. एड्स बाधीत रूग्णांच्या कुटूंबाना १० दिवस पुरेल एवढा शिदा वाटप करण्यात आला तसेच ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टर व स्टाफसाठी १० पुर्ण  पि.पी.ई. किट देण्यात आले.
प्रतप्रधान निधीसाठी देखील सर्व सभासदांनी मिळून एकूण  ५३०११ रुपये जमा करून प्रतप्रधान कोव्हीड फंडात जमा करण्यात आले. यासाठी रोटरी प्रेसिंडेंट व सभासदानी निधी जमा केला. रोटरी प्रेसिंडेंट पुनम कोचर यांनी सर्व रोटरी सभासदांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *