विद्यार्थ्यांच्या पलाकांना माहिती देण्याचे आमदार अनिल पाटील यांनी केले आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) कोट्यात शिक्षणासाठी अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळे आगारातून १०३ बसेस सोडण्यात आल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या पलाकांनी माहिती द्यावी, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी कोटा येथे बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरी आणता येणार आहे. याबाबत आमदार अनिल पाटील हे कोट्यात राहिले असल्याने त्यांना याचा अनुभव होता. याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्याशी वारंवार याबाबत पाठपुरावा करत होते. गुरुवारी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी चर्चा केली असता गुरुवारी १०३ बसेस कोट्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत. यात कोट्यात जिल्हाधिकाऱ्यांनी बसेस थांबण्याचे ठिकाण निश्चित केले असून त्या त्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. जेणेकरून विद्यार्थी त्या बसेसपर्यंत जाऊ शकतील व बस मिळेल त्या बसेस रात्री १२ वाजता पोहोचतील अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दिली. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.