प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थीने डॉ. किरण बडगुजर यांच्याकडे केले दाखल
अमळनेर(प्रतिनिधी) हृदयविकाराचा त्रास होणार्या महिलेला धुळे येथे नेण्याचा सल्ला दिल्याने उपचारासाठी फरफट होऊ लागल्याने संतप्त नातेवाइकांनी महिलेला सलाईन असलेल्या अवस्थेत थेट प्रांताधिकारी कार्यालयात आणले. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. अखेर प्रांताधिकारी सीमा अहिरे आणि तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या मध्यस्थीने डॉ. किरण बडगुजर यांच्याकडे दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गांधलीपुरा भागातील शहजानबी शेख या वृद्ध महिलेला त्रास होऊ लागल्याने एक दोन खाजगी दवाखाण्यात आले. मात्र तिला नकार दिल्याने नातेवाईकांनी सांगितले. मात्र एक खाजगी दवाखान्यात नेल्यानंतर तिचा ईसीजी काढण्यात आला. तिला हृदय विकाराचा त्रास होत असल्याने आयसीयु मध्ये दाखल करावे लागेल म्हणून धुळे नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांनी खाजगी रुग्णालयात नेले असता एक रुग्णालय सील करण्यात आले होते तर एक रुग्णालयात सुविधा नसल्याने घेतले नाही. तेथून ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र ग्रामीण रुग्णालयात आयसीयु वार्ड नसल्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी नगरसेवक नरेंद्र संदानशिव याना बोलावले. नातेवाईकांनी संतापाच्या भरात महिलेला प्रांत कार्यालयात आणले आणि खाली झोपवून दिले. काही वेळातच प्रांताधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ , डॉ. प्रकाश ताडे , डॉ. जी. एम. पाटील हजर झाले. त्यावेळी डॉ. किरण बडगुजर यांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले असता त्यांनी तात्काळ होकार दिला. नातेवाईकांची समजूत घालण्यात आली. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी देखील भेट दिली. महिलेला डॉ. बडगुजर यांच्या दवाखाण्यात दाखल केल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.