अमळनेर शहरात गोरगरिबांना देणार येणाऱ्या जेवणाचा स्वतः उपस्थितांनी घेतला आस्वाद
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे सुरू असलेल्या अन्नक्षेत्र कार्याची मंगळवारी पाहणी केली. गोरगरिबांच्या अत्यंत अडचणीच्या काळात गोशाळेतर्फे होणारे अन्नदान समाजसेवेचा आदर्श आहे अश्या भावना व्यक्त करून मुलगा जि. प. सद्स्य प्रताप पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एक दिवसाचे अन्नदान खर्चासाठी १ लाख १० हजार रुपयांची मदत केली.
यावेळी आमदार अनिल पाटील , आमदार स्मिताताई वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील ,प्रांताधिकारी सिमा अहिरे, तहसिलदार मिलिंद वाघ,पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, डॉ. राजेंद्र पिंगळे, नगरसेवक संजय पाटील उपस्थित होते. त्यांनी गोशाळेतर्फे अमळनेर शहरात गोरगरिबांना देणार येणाऱ्या जेवणाचा स्वतः आस्वाद घेतला. तसेच या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख संजय पाटील,माजी शहरप्रमुख प्रताप शिंपी,माजी नगरसेवक राजू फापोरेकर, उपशहरप्रमुख जीवन पवार, सुरज परदेशी ,विजय पाटील सह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते,
अकरा हजारापेक्षा जास्त गरिबांना अन्नदान
वर्धमान संस्कार धाम मुंबई प्रेरित श्रीमती भानूबेन शहा गो शाळेच्या या सेवाभावी अन्नक्षेत्र कार्यात स्थानिक सामाजिक संस्था, दानशूर दाते, शिक्षक मंच ,नगरसेवक यांच्यासह लोकही दातृत्व दाखवित आहेत.यामुळे जवळपास अकरा हजारापेक्षा जास्त गोरगरीब लोक आपआपल्या भागातच यशस्वीपणे थांबवून ठेवण्यात यश आलेले आहे.हजारो गरजवंतांना वेळेवर जागेवर जेवण पोहचवतानाच मात्र रोज लागणारा खर्च जमवण्याचे आव्हान गोशाळा व सामाजिक कार्यकर्त्यांसमोर असते.
मदतीसाठी विप्रो कंपनीशी केला पत्रव्यवहार
गोक्षेत्र प्रतिष्ठाणला हजारो गोरगरिबांच्या अन्नदानासाठी मदतीच्या दातृत्वासाठी आता अमळनेरला मदर युनिट असलेल्या विप्रो कंपनी कडून मदतीची अपेक्षा असून त्याबाबतचा पत्रव्यवहार संस्थेने विप्रोशी केलेला आहे.
या समाजसेवक योद्धाचे मिळतेय सहकार्य
अमळनेर शहरातील विविध भागात मागास, गोरगरीब, गरजू कुटुंबातील लोकांसाठी गोक्षेत्र प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानूबेन शाह गोशाळा या संस्थेचे संचालक शाह ,राजू सेठ ,महेंद्र पाटील आदिंनी अन्नक्षेत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात प्रा. अशोक पवार,चेतन सोनार,संदिप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,कार्यकर्ते डी. ए. धनगर , गोपाळ कुंभार,आदिंसह अनेक भागातील कार्यकर्ते स्थानिक आजी माजी नगरसेवक व युवक नियमितपणे सक्रिय कार्य करीत आहेत तर या कार्यात सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या वृत्तपत्रकार,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी,ऑनलाइन न्यूजपोर्टल व सोशल मीडियातील पत्रकार यांचे ही सक्रिय योगदान लाभत आहे. सुरवातीस वर्धमान संस्कार धाम मुंबईच्या सहकार्याने २ते ४ हजार लोकांपासून सुरू झालेले अन्नदान कार्य शहरातील २० केंद्रांवर आज ११ हजारापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचलेले आहे.यामुळे हजारो कुटुंबाना दिलासा मिळालेला असून सदरचे अन्नदान सुरू रहावे यासाठी आता स्थानिक संस्था,संघटना यांनी मदत देत पुढाकार घेतला आहे .
या २० केंद्रांवर होतेय नियोजनबध्द अन्नदान
अमळनेर शहरातील आदिवासी मागास वस्ती असलेल्या रुबजी नगर परिसरात ३ केंद्र, टाकरखेडे रस्ता म्हाडा येथील वस्ती १, रेल्वे स्टेशन पलिकडील भाग बंगाली फाईल १,खाँजा नगर १,शाह आलम नगर १,ताडेपुरा ४,पैलाड अण्णाभाऊ साठे वस्ती १, वर्णेश्वर रोड वस्ती १, चोपडा रोड स्मशान भूमी समोर १, गांधलीपुरा १,मांगवाडा नदीकाठ परिसर १,मिळचाल १,धर्मशाळा परिसर १,गलवाडे रोड पुलाखाली १, पळासदडे रोड भानूबेन शाह गोशाळा १ आदि २० केंद्रांवर नियोजनबध्द अन्नदान होत आहे.
अनुदानात योगदान देण्यासाठी संपर्क करा
या अन्नदानाचा कार्यात योगदान देण्यासाठी चेतन शहा ७०२८८९५२०१, प्रा. अशोक पवार ९४२२२७८२५६, चेतन सोनार ७७४४०२२४१९, संदिप घोरपडे ८२७५०५४३१०, रणजित शिंदे,९४२२२८२४८९ आदिंना संपर्क केल्यास आपल्याकडून मिळणारे धान्य,वस्तू अथवा रोख,चेक स्वरूपात स्विकारले जाईल, असे आवाहन गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित श्रीमती भानूबेन शहा गोशाळा अमळनेरतर्फे करण्यात आले आहे.