प्राथमिक पतसंस्थेच्या पारोळा सदस्यांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यतेसाठी ५१ हजारांची मदत

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्राथमिक पतसंस्थेच्या पारोळा सदस्यांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१००० रुपयांची मदत करण्यात आली. या मदतनिधीचा धनादेश जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार अनिल पाटील, आमदार स्मिताताई वाघ, प्रांताधिकारी सिमा अहिरे, तहसिलदार मिलिंद वाघ यांच्याकडे  सुपुर्द करण्यात आला. यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,सहाय्यक निबंधक गुलाबराव पाटील, रावसाहेब मांगो पाटील (अध्यक्ष प्रगती गट),  यशवंत शामराव शिंदे, राजेंद्र आत्माराम सोनवणे, संचालक लेखापाल प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *