खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

आरोग्य सेतू अॅप कोरोनाबाबतची सविस्तर माहिती देऊन नेहमी देते सतर्कतेचा इशारा

अॅन्ड्रॉईड व आओएस प्रणाली मोबाईलधारकांना  अॅप डाऊनलोड करण्याचे तहसीलदार मिलिंद वाघ यांचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आरोग्य सेतू अॅप विकसित केले आहे.  यातून नागरिकांना कोरोनाबाबतची सविस्तर माहिती आणि सतर्कता मिळते. त्यामुळे सर्व अॅन्ड्रॉईड व आओएस प्रणाली मोबाईलधारकांनी हे अॅप त्वरित डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.
तहसीलदार मिलिंद वाघ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारने कोविड-१९ ची माहिती जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी अॅन्ड्रॉईड व आओएस प्रणाली धारक भ्रमणध्वनी बहुभाषिक (एकूण ११ भाषांमध्ये उपलब्ध) आरोग्य सेतू अॅप विकसित केले आहे. हे अॅप ब्ल्युटुथ टेक्नॉलॉजीवर आधारीत आहे. याद्वारे कोविड-१९ बाधीत रुग्णांच्या संकलित माहितीच्या आधारे जी.पी.एस. टेक्नॉलॉजीद्वारे कोविड बाधीत रुग्ण जवळपास आल्यास (साधारणतः सहा फुटाच्या अंतरावर) वापरकर्त्यास धोक्याची सूचना देते. या अॅप मध्ये कोविड-१९ बाधेची स्वः चाचणी सुविधा, प्रतिबंधात्मक उपायोजना, सामजिक माहिती बाळगणे व प्रतिबंधासाठी काय करावे किंवा काय करुन नये याबाबतची प्रमाणित माहिती वापरकर्त्यास मिळते. स्वः चाचणीमध्ये वापरकर्ता अति धोकादायक स्थितीत आढळल्यास या अॅपद्वारे जवळच्या कोविड
तपासणी केंद्राचा क्रमांक उपलब्ध करुन दिला जातो. अथवा तात्काळ १०७५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याबाबत वापरकर्त्यास या अॅपद्वारे सुचविण्यात येते. या अॅपद्वारे कोविड-१९ बाधेच्या अनुषंगाने वापरकर्त्याच्या सर्वसाधारण प्रश्नांची प्रमाणित उत्तरे दिली जातात. तसेच, सर्व राज्यातील हेल्प लाईन क्रमांक उपलब्ध करुन दिले जातात. या अॅपद्वारे लॉकडाऊन काळात वापरकर्त्यास अपरिहार्य परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासल्यास ई-पास द्वारे अर्ज करुन पास मिळविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

नागरिकांनी यावरुन करा अॅप डाऊनलोड हे अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu वर उपलब्ध  करून देण्यात आली आहे. सर्वांनी हे अॅप डाऊनलोड करुन अॅपचा वापर करावा असे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button