खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
राजकीय

रोटरी क्लब अमळनेरतर्फे ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टराना पिपीई किट 

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब अमळनेरतर्फे अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टराना पिपीई किट देण्यात आले.
कोरोना या जागतिक महामारी काळात देवदूत रूपात आपली सेवा देणारे सर्व डाॅक्टर, परिचारिका, पॅरामेडीकलचे सर्व दूत यांनी आपला जीव धोक्यात घालून सर्वाना सेवा देवून त्यांचा जीव वाचवत आहेत. त्यामुळे भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या लढाईत सहकार्य म्हणून अमळनेर रोटरी क्लबने या सेवेला हातभार म्हणून आपल्या वतीने त्यांच्या सुरंक्षेसाठी पूर्ण पिपीई (Full Personal Protection Kit) किट ऊपलब्ध करून देण्यात आले. ते आज अमळनेर ग्रामीण रूग्णालयातील डाॅ. प्रकाश ताडे व स्टाफ यांना सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून अमळनेर रोटरी क्लब प्रेसिडेंट रो पुनम कोचर, रो डॉ राहुल मुठे, रो डॉ शरद बाविस्कर, रो सुहास राणे, रो.रोहित सिंगवी, रो विशाल शर्मा, रो अभिजित भांडारकर, रो प्रदीप  पारख, रो देवांग शहा, रो राजेश अग्रवाल, रो आशिष चैधरी उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button