खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

अन्नदान करून परतणाऱ्या तरुणांचा टेम्पो पलटी होऊन दोघांच्या मृत्यू झाल्याप्रकरणी चालकाविरुद्ध  गुन्हा दाखल 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील झाडी आणि मुडी येथून अन्नदान करून परतणाऱ्या तरुणांचा टेम्पो पलटी होऊन दोघांच्या मृत्यू झाल्याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी दिनांक  ८ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घनश्याम श्रावण सैंदाणे (रा. श्रीराम कॉलनी)  हा सलून चालक बिना नंबरचा टेम्पो घेऊन मुडीकडून अमळनेर येत असताना झाडी गावाच्या पुढे असलेल्या बापू हॉटेलजवळ वेगाने व हायगय न करता टेम्पो चालवल्याने टेम्पोने तीन पलट्या खाल्ल्या. त्यात ऋषिकेश शेटे आणि विशाल पाटकरी हे तरुण ठार झाले तर जयेश गंभीर जखमी होऊन इतर ४ जण किरकोळ जखमी झाले. स्वतः चालक सैंदाणे यांनी दिलेल्या फिर्यादवरून त्याच्याच विरुद्ध भादवी ३०४ अ , २७९ , ३३७ , ३३८ , ४२७ , मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय रोहिदास जाधव करीत आहेत. आरोपी सैंदाणे हा देखील जखमी असल्याने त्याला रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button