खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

झाडी येथे सॅनिटायझरची फवारणी करून गाव केले निर्जंतुक, मास्कही नागरिकांना वाटप

कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी झाडी केअर टेकर्स आणि ग्रामस्थांनी राबवला उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील झाडी येथे “झाडी केअर टेकर्स” च्या वतीने सॅनिटायझरची फवारणी करून गाव निर्जंतुक करण्यात आले. तसेच गावात मास्क ही वाटप करण्यात आले आहे.
झाडी येथे कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी करोनो व्हायरस सॅनिटायझर प्रतिबंधक केमिकल फवारणी संपूर्ण गावात करण्यात आली.यावेळी संपूर्ण गावातील घरांच्या आजुबाजुचा परीसर, गटारी, स्वच्छतागृह,मंदिरे तसेच सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्यात आली. या फवारणीसाठी झाडी कर ग्रुप तसेच  केअरटेकर्स व झाडी येथील सामूहिक लोकांनी मदतीचा हात देऊन सॅनिटायझर प्रतिबंधक केमिकल उपलब्ध करून दिले. यावेळी जगदीश पाटील, योगेश पाटील,राकेश पाटील, काटे, भावेश पाटील,यश पाटील,आसाराम पाटील,जयंवत पाटील,जितेंद्र पाटील,उदय पाटील,गोलु दादा,मयुर पाटील आदीची साथ लाभली. तसेच योगेश पाटील हर्षल पाटील, राकेश पाटील, गोलु पाटील, समाधान पाटील,विजय दिनकर पाटील,मयुर पाटील आदी च्या सहकार्याने मास्क वाटप करण्यात आले. तसेच कोणाला काही अडचण भासल्यास झाडी केअर टेकर्स यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button