खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या सहकार्याने मार्केट केले निर्जंतुकीकरण

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या हितासाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतीत धान्य खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी बांधव तसेच व्यापारी आणि कर्मचाऱ्यांची गर्दी होत असल्याने त्यांचे कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे यासाठी अमळनेर नगरपरिषदेच्या सहकार्याने मार्केट आवारात औषध फवारणी करून संपूर्ण आवाराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
बाजार समितीचे सभापती प्रफुल पाटील यांनी स्वतः उभे राहून ही फवारणी करून घेतली. याबाबत सभापतींसह आमदार स्मिताताई वाघ यांनीही माजी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांना विनंती करून शहराप्रमाणेच मार्केट परिसरात देखील औषध फवारणी करण्याची विनंती केली होती. शेतकरी व इतर घटकांच्या दृष्टीने त्यांनी तात्काळ पालिकेस सूचना केल्याने पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने रविवारी सुटीच्या दिवशी मार्केट परिसरात फवारणी करण्यात आली. सभापती प्रफुल पाटील,सहाय्यक निबंधक जी.एच.पाटील, यांनी शेतकरी हितासाठी धान्य खरेदी सुरू केली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कुणालाही होऊ नये यासाठी पुरेशी दक्षता घेतली असून सोशल डिस्टनसिंग राखण्यासाठी मार्केटच्या प्रवेशद्वारावर ते स्वतः थांबून प्रत्येकास सॅनिटायझर देऊन एकेकास आत प्रवेश देत असतात. लिलावाच्या ठिकाणीदेखील सोशल डिस्टनसिंग राखण्याची पुरेशी दक्षता ते घेत असतात. एवढेच नव्हे तर प्रत्येकास मास्क लावण्याच्या सूचना वारंवार करीत असतात. आमदार स्मिता वाघ देखील या सूचना देण्यासाठी बराच वेळ खरेदीच्या ठिकाणी येऊन थांबत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button